-
केंद्र सरकारने अनेक सूचना आणि निर्देश देऊनही काही अश्लील कंटेंट पोस्ट करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि ॲप्सवर आता बंदी घालण्यात आली आहे.
-
केंद्र सरकारने अश्लील कंटेंट पोस्ट करणाऱ्या एकूण १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.
-
केंद्र सरकारच्या अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनकट अड्डा, ड्रीम्स फिल्म्स आणि प्राइम प्ले सारख्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर बंदी घातली आहे.
-
विशेष म्हणजे, या ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत.
-
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७अ, भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम २९२ आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायद्यानुसार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या बंदीमागचे कारण स्पष्ट सांगितले आहे की “या प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेल्या कंटेंटमुळे स्त्रियांना अपमानास्पद रीतीने दाखवले जाते.
-
या ओटीटी ॲप्सच्या स्केलबद्दल बोलताना केंद्र सरकारने सांगितले की, यापैकी एका ॲपने 1 कोटींहून अधिक डाउनलोड केले गेले आहे तर इतर दोन ॲप्सचे गुगल प्ले स्टोर वर ५० लाखांहून अधिक डाउनलोड झाले आहेत.
-
दरम्यान, या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हँडलवर ३२ लाखांहून अधिक फॉलोअरशिप होती.
-
ड्रीम्स फिल्म्स, वूवी, येस्मा,अनकट अड्डा,ट्राय फ्लिक्स, एक्स प्राइम, निऑन एक्स व्हीआयपी, बेशरम्स, हंटर, रैबिट, न्यूफ्लिक्स,मूडएक्स,हॉट शॉट्स व्हीआयपी,फुगी,चिकूफ्लिक्स आणि प्राइम प्ले या ओटीटी ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो: अनस्पलॅश)

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा