-
भारतात अमेरिका, चीन, रशियानंतर जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात दररोज २ कोटी अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात.(फोटो – जनसत्ता)
-
प्रवाशांची ने-आण करणाऱ्या प्रत्येक ट्रेनची एक प्रवास वेळ असते. त्यावेळेनुसारच सर्व ट्रेन्स धावतात. पण भारतात अशी एक एक्सप्रेस आहे जी देशातील सर्वात लांबचा प्रवास करते
-
विवेक एक्सप्रेस असे या ट्रेनचे नाव असून ती भारतातील सर्वात लांबचा प्रवास करते. मी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विवेक एक्सप्रेस सुरू करण्यात आली. (फोटो – जनसत्ता)
-
ही ट्रेन आसाममधील दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी असे ४,३०० किमीचे अंतर कापते. यामुळे अनेक राज्यांमधून ती प्रवास करते आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचते. (प्रातिनिधीक फोटो)
-
विवेक एक्सप्रेसला हे अंतर कापण्यासाठी ८० तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवासादरम्यान ही ट्रेन ५९ स्थानकांवर थांबते. (संग्रहित फोटो)
-
एवढेच नाही तर प्रवास पूर्ण करताना विवेक एक्सप्रेस देशातील ९ राज्यांमधून जाते. ही रेल्वे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण उपखंडातील सर्वात लांब आहे. (फोटो – संग्रहित)
-
विवेक एक्स्प्रेसमध्ये दिब्रुगढ ते कन्याकुमारी या प्रवासासाठी तुम्हाला १२०० ते ५००० रुपये भाडे द्यावे लागते. या ट्रेनमधील थर्ड एसीचे भाडे सुमारे ३००० रुपये आहे. तसेच, सेकंड एसीचे भाडे सुमारे ५००० रुपये आणि स्लिपर कोचचे भाडे सुमारे १२०० रुपये आहे. (फोटो – संग्रहित)
-
२०११-१२ च्या रेल्वे बजेटमध्ये विवेक एक्सप्रेसची घोषणा करण्यात आली होती. विवेक एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून फक्त दोन दिवस धावते. ती दिब्रुगडहून संध्याकाळी ७.२५ वाजता निघते आणि सुमारे ८० तासांनी कन्याकुमारी स्थानकावर पोहोचते. (PHOTO – Pixabay)
