-
जग विचित्र लोक आणि रहस्यमय ठिकाणांनी भरलेले आहे. काही ठिकाणं इतकी रहस्यमय आहेत की त्यांच्याबद्दल जाणून घेऊन शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटेल.
-
यातल्या अनेक गोष्टींमागचं तथ्य कधीच जगासमोर येत नाही. जे अनेकांना विचार करायला भाग पाडतात.
-
आज आपण अशाच एका ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत जिथे लोक जन्मापासून तर ठीक असतात, पण वयाच्या सातव्या वर्षानंतर त्यांची उंची वाढत नाही.
-
या गावातले बहुतांश नागरिक बुटके आहेत. पाच ते सात वर्षांपर्यंत त्यांची वाढ सामान्यपणे होते. परंतु, या वयानंतर त्यांची उंची वाढत नाही.
-
हे गाव चीनमधल्या सिचुआन प्रांतात आहे. या गावातील कोणाचीही उंची तीन फुटांपेक्षा अधिक नसल्याचं दिसून आलं आहे. हे रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही समजू शकलेले नाही.
-
या गावात राहणाऱ्या बहुतांश नागरिकांची उंची दोन ते तीन फुटांपेक्षा अधिक वाढत नाही. या गावातले ५० टक्के नागरिक हे बुटके आहेत. यापैकी कोणत्याच व्यक्तीची उंची दोन ते तीन फुटांपेक्षा अधिक वाढलेली नाही.
-
हे गाव केवळ चीनसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक रहस्य आहे. शास्त्रज्ञांनीही इथे खूप संशोधन केले, पण त्यामागचे कारण कोणालाच कळू शकले नाही.
-
येथील लोक बुटकी असण्यामागे येथील लोकांचे अनेक तर्कवितर्क आहेत. काही लोक म्हणतात की, हे गाव शापित आहे, तर काही लोक म्हणतात की काही दशकांपूर्वी आलेल्या एका आजाराने इथल्या सर्व लोकांना वेढले होते, त्यामुळे इथल्या लोकांची उंची वाढत नाही.
-
तर काही जणांचे म्हणणे आहे की, जपानने चीनच्या दिशेनं विषारी वायू सोडला होता. या विषारी वायूच्या प्रभावामुळे या गावातील लोकांची उंची वाढत नाही. परंतु, या रहस्यामागे नेमकं कारण काय, हे अद्याप कळू शकलेलं नाही. (फोटो सौजन्य : Freepik)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा