-
भारतातील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ते भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कुमार विश्वास अनेकदा काव्य संमेलनांसाठी परदेशात जात असतात. (@Dr. Kumar Vishwas/FB)
-
आज कुमार विश्वास यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. त्यांचे साम्राज्य उत्तर प्रदेशपर्यंतच नव्हे तर उत्तराखंडपर्यंतही विस्तारले आहे. त्यांच्याकडील संपत्ती आणि काव्य संमेलनासाठी घेत असलेल्या मानधनाबद्दल जाणून घेऊयात (@Dr. Kumar Vishwas/FB)
-
myneta.info वेबसाइटनुसार, 2014 मध्ये कुमार विश्वास यांच्याकडे 2 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्या पत्नीच्या नावावर पिलखुआमध्ये 2 आणि गाझियाबादला लागून असलेल्या मोदी नगरमध्ये प्रत्येकी 2 शेतजमिनी आहेत, ज्यांची किंमत 33 लाखांपेक्षा जास्त आहे. (@Dr. Kumar Vishwas/FB)
-
पिलखुआ येथे कुमार विश्वास यांच्या नावावर 1 तर गाझियाबादच्या वसुंधरा येथे 1 बिगरशेती जमीन आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावावर उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीन बिगरशेती जमिनी आहेत. या दोघांच्या नावावर असलेल्या या जमिनींची किंमत ५९ लाख रुपयांहून अधिक आहे. (@Dr. Kumar Vishwas/FB)
-
कुमार विश्वास यांच्या नावावर वसुंधरा, गाझियाबाद येथे एक-एक घर आहे तर ऋषिकेशमध्ये आणखी एक घर आहे. त्याचबरोबर ऋषिकेशमध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर एक कोटी रुपये किमतीचे घर आहे. कुमार विश्वास यांच्याकडे एकूण 1,94,57,000 रुपयांची संपत्ती आहे. (@Dr. Kumar Vishwas/FB)
-
2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, कुमार विश्वास यांची एकूण संपत्ती 3,82,00,805 रुपये होती. मात्र, आता त्यांची संपत्ती पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त आहे. (@Dr. Kumar Vishwas/FB)
-
कुमार विश्वास अवघ्या 20 मिनिटांच्या काव्य संमेलनाच्या कार्यक्रमातून 10 लाख रुपये कमावतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 ते 20 मिनिटांच्या कविता सादरीकरणासाठी ते लाखो रुपये घेतात. (@Dr. Kumar Vishwas/FB)
-
माध्यमांतील माहितीनुसार कुमार विश्वास 2023 साली छत्तीसगडची राजधानी रायगडमध्ये आयोजित रामायण महोत्सवाच्या कार्यक्रमात पोहोचले होते, तेव्हा त्यांनी कविता सादरीकरणासाठी सुमारे 60 लाख रुपये फी घेतली होती. (@Dr. Kumar Vishwas/FB)

बापरे! अॅमेझॉनच्या जंगलात दिसला महाकाय अॅनाकोंडा; हत्तीलाही गिळू शकतो एवढा मोठा साप, VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली