-
पटणाच्या खान सरांना ओळखत नाही असा कोणीही नसेल. खान सरांची शिकवण्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. (खान ग्लोबल स्टडीज/ट्विटर)
-
देशभरात प्रसिद्ध असलेल्या खान सरांची कोचिंग फी तुम्हाला माहिती आहे का? आज आपण खान सर एका कोर्ससाठी किती फी घेतात ते जाणून घेऊया. (खान ग्लोबल स्टडीज/ट्विटर)
-
खान सरांच्या कोचिंग वेबसाइट खान ग्लोबल स्टडीजनुसार, प्रत्येक कोर्सची फी वेगवेगळी आहे. (खान ग्लोबल स्टडीज/ट्विटर)
-
UPSC कोचिंगचे शुल्क फक्त GS पेपरसाठी (इंग्रजी माध्यम) ७९,५०० रुपये आहे. या कालावधीत, एक वर्षासाठी फाउंडेशन बॅचमध्ये UPSC GS Prelims आणि Mains ची तयारी केली जाते.(इंडियन एक्सप्रेस)
-
तसेच हिंदी माध्यमाची फी ६९,५०० ते एक लाख रुपयांपर्यंत आहे.(इंडियन एक्सप्रेस)
-
बिहार पीएससी परीक्षेसाठी, फाउंडेशन बॅचसाठी २० ते ३० हजार रुपये शुल्क भरावे लागतात. यामध्ये पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची तयारी केली जाते. (खान ग्लोबल स्टडीज/ट्विटर)
-
खान सरांच्या प्रशिक्षणाखाली अकरावी, बारावी आणि NEET च्या वेगवेगळ्या बॅच चालतात. NEET साठी एक वर्षाची फी २५ हजार रुपये आहे. तर बारावी पास अचिव्हर बॅचसाठी वार्षिक फी ३० हजार ते दीड लाख रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
IIT JEE परीक्षेची (JEE Mains आणि JEE Advanced) आणि अकरावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी दरवर्षी २५ ते ३० हजार रुपये शुल्क आहे. ही फी दीड लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकते.
-
यूपीएससी आणि फाउंडेशन बॅचचे शुल्क २७ ते ३७ हजार रुपयांपर्यंत आहे. विद्यार्थ्यांना दीड वर्षे प्री आणि मेनसाठी तयार केले जाते.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल