-
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. या प्रकरणाबाबत देशभरातील लोक संतापले असून आपापली मते व्यक्त करत आहेत. (फोटो स्रोत: @dhanashree9/instagram)
-
अनेक बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सनीही या मुद्द्यावर आपला निषेध व्यक्त केला आहे. आता एका क्रिकेटरच्या पत्नीनेही या मुद्द्यावरून संताप व्यक्त करत मोठी मागणी केली आहे. (फोटो स्रोत: @dhanashree9/instagram)
-
भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. (फोटो स्रोत: @dhanashree9/instagram)
-
धनश्रीने नुकतीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात आवाज उठवला आहे. बलात्काराच्या आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवले पाहिजे, असे तिचे मत आहे. (फोटो स्रोत: @dhanashree9/instagram)
-
धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
ज्यामध्ये लिहिले आहे की, “नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते, लॉकडाऊन एका रात्रीत लागू होऊ शकते, मग एका रात्रीत बलात्कार करणाऱ्याला फाशी का दिली जाऊ शकत नाही.” (फोटो स्रोत: @dhanashree9/instagram)
-
याआधी युझवेंद्र चहलनेही या मुद्द्यावर आपली तिखट प्रतिक्रिया दिली होती. (फोटो स्रोत: @dhanashree9/instagram)
-
मात्र, काही वेळाने युजवेंद्रने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली ही स्टोरी काढून टाकली होती. पण त्याच्या इन्स्टा स्टोरीचा हा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला. या जोडप्यापूर्वी सौरव गांगुली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही महिलांच्या सुरक्षेची मागणी करत आवाज उठवला आहे. (फोटो स्रोत: @yuzi_chahal23/instagram)

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश