सध्या मुंबईसह संपूर्ण देशात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे.गणेश उत्सवात मुंबईत अनेक भव्य गणेश मंडळ पाहायला मिळतात. भाविकांना यंदा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजे लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.यावेळी लालबागच्या राजाचं हे ९१ वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या थीमबद्दल बोलायचे झाले तर यंदा काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आली आहे. तसेच या यंदा बाप्पाला मरुन रंगाच्या पोशाखाने तयार केलं आहे.लालबागच्या राजाचे मुकूट हे २० किलोचं आहे.मूर्तीच्या मुकूटाची किंमत १६ कोटी रुपये आहे.दरवर्षी या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.अनेक बॉलीवूड कलाकार, उद्योगपती आणि नेत्यांची देखील उपस्थिती इथे पाहायला मिळते.