-
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांच्या निधनापूर्वी मृत्यूपत्र तयार केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर, मालमत्ता आणि इतर गोष्टी त्या मृत्युपत्रानुसार विभागल्या गेल्या आहेत.
-
पण या मृत्यूपत्रात त्यांनी काही शेअर्सबद्दल उल्लेख केला नव्हता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते.
-
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आदेश दिला आहे की, रतन टाटा यांच्या लिस्टेड आणि अनलिस्टेड शेअर्सची मालकी आता रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टकडे राहणार आहे.
-
न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. हे प्रकरण रतन टाटा यांच्या मृत्युपत्रावरील निर्णयाबाबत होते.
-
न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी सांगितले की, रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात ज्या गोष्टींचा उल्लेख केला नाही त्यांची मालकी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांकडे असावी.
-
खंडपीठाने म्हटले की, रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टची स्थापना रतन टाटा यांनी स्वतः केली होती.
-
यामुळे न्यायालयाने नमूद केले की, रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख न केलेले लिस्टेड आणि अनलिस्टेड शेअर्स त्यांच्या दोन्ही ट्रस्टमध्ये समान प्रमाणात विभागले जातील.
-
या प्रकरणात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि न्यायालयाला रतन टाटांच्या शेअर्सच्या मालकीबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती.
-
दरम्यान उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ मध्ये निधन झाले होते. (सर्व फोटो सौजन्य: पीटीआय)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल