-
Income Tax Return 2025 : आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख हळूहळू जवळ येत आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आयटीआर भरला नसेल, तर लगेच भरा.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
या वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत वाढवली देखील जाऊ शकते. पण मुदतीपर्यंत आयटीआर न भरल्यास लेट फीसह दंड आणि व्याज भरावं लागू शकतं.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
या वर्षी आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
तुमचा आयकर रिटर्न (ITR) डिजिटल पद्धतीने भरणे आता आधीपेक्षा जास्त सोप्प झालं आहे. चार्टर्ड अकाउंटंटची मदत न घेता तुम्ही देखील आयटीआर भरू शकता. कसा ते जाणून घेऊयात.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
सर्व कागदपत्रे गोळा करा : तुम्ही तुमचा १६ नंबरचा फॉर्म, बँकेचे वार्षिक विवरणपत्रे, व्याज प्रमाणपत्रांसह फॉर्म २६ एएस आणि वार्षिक माहिती विवरणपत्र (एआयएस) यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे जमा करा. (फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
आयकर पोर्टलवर लॉग इन करा : सर्व संबंधित कागदपत्रे जमा झाल्यानंतर तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in ला भेट द्या. तुमचा पॅन, आधार कार्ड आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
आयटीआर फॉर्म निवडा : पगारदार व्यक्तींनी आयटीआर-१ फॉर्म सामान्यतः योग्य फॉर्म असतो. ज्या करदात्यांना अनेक उत्पन्नाचे स्रोत असतात त्यांच्यासाठी आयटीआर-२ किंवा ३ ची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही योग्य यो फॉर्म निवडा.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
तपशील पडताळणी करा : तुम्ही अर्ज भरताना सबमिट केलेला डेटा अचूक आणि अपडेट केलेला आहे याची खात्री करण्यासाठी पूर्व-भरलेल्या तपशीलांची काळजीपूर्वक पुनरावलोकन आणि पडताळणी करा.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
वजावट आणि उत्पन्न जाहीर करा : उत्पन्नाचे तपशील प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या वैयक्तिक लागू असलेल्या कलम ८० सी, ८० डी इत्यादी अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता. हे तुमच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असतं. (फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
पुनरावलोकन करा आणि सबमिट करा : फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, कोणत्याही त्रुटी नाहीत याची खात्री करण्यासाठी तुम्ही पुन्हा तपासा. सर्वकाही बरोबर दिसल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.

Amit Shah: अमित शाह राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार? म्हणाले, “वेद, उपनिषद आणि…”