-
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (संग्रहित फोटो)
-
काल (८ जुलै) एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की ते दिल्लीत येण्यापूर्वीच त्यांचे परत जाण्याचे तिकीटही बुक करतात. प्रदूषण कमी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले. (संग्रहित फोटो)
-
ते दिल्लीतील गौतम बुद्ध नगरमधील ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. (संग्रहित फोटो)
-
काय म्हणाले गडकरी?
‘मी दिल्लीत फक्त दोन किंवा तीन दिवसच राहतो आणि जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा मी कधी परत जाईन याचाच विचार करतो. मी माझे परतीचे तिकीट आधीच बुक करतो. तुम्ही माझे म्हणणे गांभीर्याने घ्या. दिल्लीतील प्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान कमी झाले आहे.” (संग्रहित फोटो) -
इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांचा वापर व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमांद्वारे प्रदूषण प्रभावीपणे कमी करता येऊ शकते. सरकार या दोन्हींवर सक्रियपणे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (संग्रहित फोटो)
-
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, सरकार रस्ते बांधणी करण्यासाठी कचऱ्याचाही वापर करत आहे आणि यासाठी सुमारे ८० लाख टन कचरा वापरण्यात आला आहे. गडकरी म्हणाले, “महामार्गांवर पावसाचे पाणी झिरपण्यासारखे उपाय अवलंबून जलसंवर्धनालाही प्राधान्य देत आहोत.” (संग्रहित फोटो)
-
सरकारने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, एनएचएआय सध्या बांबू लागवड, दाट वृक्षारोपण आणि ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. (संग्रहित फोटो)
-
त्यामध्ये पुढे म्हटले आहे की, एनएचएआयने २०२४-२५ दरम्यान ६० लाख वृक्षारोपणाच्या उद्दिष्ट असताना सुमारे ६७ लाख झाडे लावली आहेत. (संग्रहित फोटो)
-
(संग्रहित फोटो) हेही पाहा- सौरव गांगुलीच्या लेकीला पाहिलंत का? कोलकात्यातील शाळा ते लंडनमधून पदवी; ‘या’ श्रेत्रात करतेय काम…

Vadodara Bridge Collapse : वडोदरामध्ये मोठी दर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला; अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू