-
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence किती धोकादायक आहे, याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. आसामच्या मॉडेलचे एआयद्वारे एडिटेड फोटो आणि व्हिडीओ वापरून तिच्या माजी प्रियकराने संबंध देशाला गंडवले. या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्याने काही दिवसातच १० लाख रुपये कमविल्याचे समोर आले आहे. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
आसामच्या मॉडेलचा चेहरा वापरून नवे इन्स्टाग्राम हँडल तयार करण्यात आले. त्यावर तिचे एआयने एडिट केलेले फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. तसेच अमेरिकेतील ॲडल्ट स्टार केंड्रा लस्टबरोबरही तिचे फोटो या हँडलवर अपलोड करण्यात आले होते. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
केंड्रा लस्टबरोबर फोटो समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केल्याचेही या हँडलवरून भासवले गेले. याबद्दलच्या अनेक बातम्या माध्यमांनी दाखवल्या. त्यानंतर संबंधित तरूणीला धक्काच बसला. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
नाहक बदनामी होत असल्यामुळे पीडितेने आसामच्या दिब्रुगड पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली.
-
दिब्रुगड पोलिसांनी पीडितेचा माजी प्रियकर प्रतिम बोरा याला अटक केली आहे. प्रेमसंबंध तुटल्यानंतर त्याने सूड उगविण्यासाठी सदर प्रकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
पीडिता दुसऱ्याशी लग्न करणार होती, हा निर्णय प्रतिम बोराला पचविता आला नाही. त्यामुळे त्याने पीडितेला बदनाम करण्यासाठी एआय टुल्सचा वापर करत तिचे अनेक एडिटेड फोटो आणि व्हिडीओ तयार केले. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
प्रतिम बोराच्या या सूड उगविण्याच्या प्रयत्नामुळे पीडित तरूणी मात्र रातोरात चर्चेचा विषय ठरली. केंड्रा लस्टबरोबरच्या तिच्या फोटोमुळे तिची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
दिब्रुगडच्या पोलीस अधीक्षक सिझल अग्रवाल यांनी सांगितले की, आरोपीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. त्याने पीडित तरूणीचा चेहरा वापरून पॉर्नोग्राफिक कंटेट तयार केला आणि तो इंटरनेटवर विकला. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
प्रतिम बोराने आपला गुन्हा मान्य केला आहे. लिंक३ सारख्या वेबसाइटवर त्याने सबस्क्रिप्शन सुरू करून पीडित तरूणीचे एडिटेड चेहरा असलेले व्हिडीओ विकले. ज्यातून त्याने १० लाख रुपये कामवले. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
दरम्यान इश्तारा अमीरा या हँडलवर पीडित तरूणीच्या चेहऱ्याचे फोटो पोस्ट करून माजी प्रियकराने अनेक खोट्या बातम्याही पसरविल्याचे समोर आले आहे. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira) -
पीडित तरूणीच्या वतीने अद्याप यावर स्पष्टीकरण पुढे आलेले नाही. तिच्या इन्स्टाग्राम हँडलचा गैरवापर कसा झाला? त्याला १३ लाख फॉलोअर्स कसे मिळाले, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम /
@ishtaraamira)

सरन्यायाधीश गवईंच्या तब्येतीबाबत मोठी बातमी, तातडीने रुग्णालयात दाखल….