-
Pune Cafe Goodluck Loses Licence: पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला आता टाळं ठोकण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केल्याची माहिती आहे. (Photo: flavours.and.journeys: Instagram)
-
काही दिवसांपूर्वीच एफ सी रोडवरील या गुडलक कॅफेत बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळून आले होते. परंतू हॉटेल मालकाने, हॉटेल दुरुस्तीच्या कामामुळे कॅफे बंद ठेवण्यात आला असल्याचे सांगितले आहे, तसा फलक बाहेर लावण्यात आला आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram)
-
काय घडलेलं?
३ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक जोडपं कॅफेमध्ये पोहोचलं होतं, बन मस्क्याची त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला होता. (Photo: flavours.and.journeys/Instagram) -
या व्हायरल व्हिडिओची दखल घेत एफडीएने ने Goodluck Cafe ची तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅफेमध्ये अनेक अस्वच्छ गोष्टी आढळल्या. त्यामुळे एफडीएने तातडीने कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे कॅफेच्या ग्राहकांमध्ये आणि पुणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram)
-
त्या व्हिडिओनंतर गुडलक कॅफेबद्दल सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात येत होता. (Photo: flavours.and.journeys/Instagram)
-
का प्रसिद्ध आहे गुडलक कॅफे?
गुडलक कॅफे हा पुण्यातल्या खाद्यप्रेमींसाठीचे एक प्रसिद्ध व आवडते ठिकाण आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram) -
गुडलक कॅफेमध्ये बन मस्कापाव, इराणी चहा व इतर पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची रीघ लागलेली असते. (Photo: flavours.and.journeys/Instagram)
-
मात्र याच गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये चक्क काचेचा तुकडा आढळून आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Photo: flavours.and.journeys/Instagram)

Russian Woman : रशियन महिलेचं आठ वर्षांपासून जंगलातल्या होतं गुहेत वास्तव्य, ही महिला इथे कशी पोहोचली? पोलिसांनी काय सांगितलं?