-
Tesla India Updates: उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला (Tesla) कंपनीच्या पहिल्या शोरूमचे आज (१५ जुलै) मुंबईत (Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
वांद्रे-कुर्ला संकुल येथील मेकर मॅक्सिटी (Bandra Kurla Complex Maker Maxity) कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाचे पहिले शोरूम (Tesla Showroom) आहे.
-
वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) हे ठिकाण मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे.
-
टेस्लाने पहिल्या टप्प्यात भारतात त्यांची मॉडेल वाय ही कार लॉन्च (Tesla Model Y Launched In India) केली आहे.
-
या कारची ऑन रोड किंमत ६१ लाख रुपये (Tesla Model Y Car Price) इतकी असणार आहे.
-
या कारच्या रिअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी ग्राहकांना ५९.८९ लाख रुपये मोजावे लागतील, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.
-
टेस्लाचे मॉडेल वाय हे सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारे इलेक्ट्रिक वाहन (Electric Car) आहे.
-
मुंबईनंतर टेस्ला आपले दुसरे शोरूम जुलैच्या अखेरीस दिल्लीत (Delhi) सुरू करणार आहे. त्यानंतर भारतात टेस्लाचा वेगाने विस्तार होईल.
-
आता मुंबईसह भारतातील रस्त्यांवर टेस्लाच्या गाड्या धावताना दिसणार आहेत.

ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही…”