-
फोर्ब्स २०२५ च्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्थलांतरितांच्या यादीनुसार, अब्जाधीशांच्या लोकसंख्येत भारत अव्वल योगदानकर्ता म्हणून उदयास आला आहे. १२ अब्जाधीशांसह, भारताने इस्रायल आणि तैवानला मागे टाकले आहे.
-
जय चौधरी हे झेडस्केलरचे संस्थापक आहेत. ते हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावात वाढले आणि त्यांनी सायबर सुरक्षा क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य उभे केले. त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आणि आता ते १७.९ अब्ज डॉलर्स किमतीच्या कंपनीचे प्रमुख आहेत. (Photo source: LinkedIn)
-
विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टम्सचे सह-संस्थापक आहेत आणि अव्वल उद्यम भांडवलदार आहेत. त्यांची कंपनी खोसला व्हेंचर्स ही तंत्रज्ञान आणि हवामान स्टार्टअप्सशी संबंधित आहे. (संपत्ती ९.३ अब्ज डॉलर्स). (Photo source: Reuters)
-
राकेश गंगवाल हे एक विमान वाहतूक उद्योजक आहेत. इंडिगो एअरलाइन्सची सह-स्थापना करण्यापूर्वी त्यांनी यूएस एअरवेजचे सीईओ म्हणून काम केले. ते आता जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. (संपत्ती ६.६ अब्ज डॉलर्स) (Photo source: goindigo.in)
-
रोमेश टी वाधवानी हे एक एआय आणि सॉफ्टवेअर इनोव्हेटर असून ते सिम्फनीएआयचे संस्थापक आहेत. (संपत्ती ५.० अब्ज डॉलर्स). (Photo source: X)
-
राजीव जैन हे इनव्हेस्टमेंट फंड मॅनेजर आणि GQG पार्टनर्सचे संस्थापक आहेत. ते जागतिक इक्विटीजमध्ये अब्जावधींचे व्यवस्थापन करतात. (संपत्ती ६.६ अब्ज डॉलर्स). (Photo source: GQG Partners)
-
कवितार्क राम श्रीराम हे एक टेक गुंतवणूकदार आहेत आणि सिलिकॉन व्हॅलीच्या व्हेंचर कॅपिटल क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. (संपत्ती $ ३.० अब्ज) (Photo source: X)
-
राज सरदाना हे आयटी आणि बिझनेस सर्व्हिसेसचे प्रमुख आणि इनोव्हा सोल्युशन्सचे सीईओ आहेत. त्यांची कंपनी विविध उद्योगांमध्ये फॉर्च्यून १०० कंपन्यांना देखील पाठिंबा देते. ($ २.० अब्ज) (Photo source: X)
-
डेव्हिड पॉल हे एक आरोग्य सेवा उद्योजक आहेत आणि त्यांनी अनेक स्टार्टअप्सद्वारे वैद्यकीय उपकरणांमध्ये संपत्ती निर्माण केली आहे. ($१.५ अब्ज) (Photo source: LinkedIn)
-
निकेश अरोरा हे प्लेटो अल्टो नेटवर्क्सचे सीईओ आहेत आणि गुगलचे माजी एक्झिक्युटिव्ह देखील आहेत. ($१.४ अब्ज) (Photo source: Reuters)
-
सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ आहेत. ते मूळचे चेन्नईचे आहेत आणि सध्या गुगलच्या मूळ कंपनीचे ते नेतृत्व करतात. ($१.१ अब्ज) Photo source: Reuters)
-
सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. त्यांच्या कारकिर्दीत कंपनीची लक्षणीय महसूल वाढ आणि अधिग्रहण झाले आहे. ($१ अब्ज) (Photo source: Reuters)
-
नीरजा सेठी ही सिंटेलची सह-संस्थापक आहे आणि तिने सर्वात यशस्वी आयटी सेवा कंपन्यांपैकी एक उभारण्यात मदत केली आहे. ($१.० अब्ज) (Photo source: X)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?