-
Manikrao Kokate Controversial Statements : विधान परिषदेत भ्रमणध्वनीवर पत्ते खेळत असल्याच्या व्हायरल व्हिडीओने अडचणीत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्ये जाणून घेऊयात…
-
ओसाड गावची पाटीलकी
कृषिमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून वादग्रस्त विधानांनी कोकाटे हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कृषिखात्याची जबाबदारी मिळताच एका कार्यक्रमात त्यांनी हे खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे म्हटले होते. -
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने काही महिन्यांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला होता.
-
या प्रश्नाचं उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचं पाहायला मिळालं होतं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं की, “मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्ज भरायच नाही”
-
“तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं होतं.
-
नंतर पीक विमा योजनेच्या विधानावरून वाद उद्भवला. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. सरकारने एक रुपयात पीक विमा दिला. त्याचा गैरफायदा लोकांनी घेतला असेही त्यांनी म्हटले होते.
-
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
मान्सूनपूर्व पावसात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेव्हा शेतात जे कांदे आहेत, त्याचे पंचनामे होतील, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा प्रश्न कोकाटे यांनी केला होता. -
कांद्यावरून वक्तव्य
कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. -
सर्व फोटो साभार- माणिकराव कोकाटे, हेही पाहा- Manikrao Kokate Net Worth: थेट विधानसभेत रमी; व्हिडिओत दिसणारे माणिकराव कोकाटे कोट्यधीश; वाचा मालमत्तेची माहिती

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…