-
प्रेइंग मेंटिस
या प्रजातीतील मादी नर जोडीदाराला संभोग करताना किंवा नंतर खातात. (Photo: Pexels) -
कारण काय?
ही कृती अतिरिक्त पोषक घटक देऊन, मादीच्या प्रजननातील यशात वाढ करू शकते. (Photo: Pexels) -
रेडबॅक स्पायडर
यांतील नर बहुतेकदा लैंगिक संबंधादरम्यान मादीच्या तोंडात घुसतात. त्यांच्या या कृतीमुळे मादीला त्यांना खाणे सोपे जाते. या आत्मत्यागी वर्तनामुळे संभोगाच्या कालावधीसह गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता वाढते. (Photo: Pexels) -
ब्लॅक विडो स्पायडर
हे कोळी नेहमीच त्यांच्या जोडीदारांना खातात; परंतु हे सर्व प्रजातींसाठी खरे नाही. काही ब्लॅक विडो स्पायडरचे वर्तन असे असते; पण काहींमध्ये हे वर्तन क्वचितच दिसते. (Photo: Pexels) -
ब्ल्यू लाईन ऑक्टोपस
यांनी त्यांना मोठ्या नरभक्षक माद्यांनी खाऊ नये म्हणून एक अनोखी रणनीती विकसित केली आहे. (Photo: Pexels) -
हे कसे करतात?
संभोगादरम्यान मादीमध्ये एक शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन, टेट्रोडोटॉक्सिन इंजेक्ट करतात, ज्यामुळे तिला तात्पुरत्या स्वरूपात अर्धांगवायू होतो आणि नरभक्षण होणे टाळले जाते. (Photo: Pexels) -
नर्सरी वेब स्पायडर
या प्रजातीमध्ये नरांना संभोगाच्या वेळी मादींकडून खाल्ले जाण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी नर मादीचे पाय रेशमाने गुंडाळतात. (Photo: Pexels) -
त्याने काय होते?
असे केल्याने तिला हालचाल करणे कठीण होते आणि त्यामुळे नरभक्षण होण्याची शक्यता कमी होते. हे वर्तन संभोगाच्या वेळी स्व-संरक्षणाच्या दृष्टीने केले जाते. (Photo: Pexels) -
क्रॅब स्पायडर
या प्रजातीमध्ये ‘लैंगिक नरभक्षण’ सामान्य आहे. वृद्ध नरांवर माद्यांकडून हल्ला होण्याची आणि त्यांना खाल्ले जाण्याची शक्यता जास्त असते; विशेषतः मिलन हंगामाच्या उत्तरार्धात जेव्हा मादी आक्रमकता वाढते. (Photo: Pexels) -
ग्रीन अँड गोल्डन बेल फ्रॉग
यामध्ये मादी संभोगानंतर नर जोडीदाराला खाण्याचा प्रयत्न करते. जरी हे दुर्मीळ असले तरी या प्रजातीमध्ये लैंगिक नरभक्षण होऊ शकते. (Photo: Pexels) -
ग्रीन अॅनाकोंडा
यामध्ये मादी संभोगानंतर नरांना खात असल्याचे आढळून आले आहे. असे मानले जाते की, या वर्तनामुळे माद्यांना गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले अतिरिक्त पोषक घटक मिळतात. (Photo: Pexels) हेही पाहा- जगातल्या ‘या’ एकमेव देशाच्या राष्ट्रीय ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; तिथे हिंदूंची संख्या किती? जाणून घ्या…

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…