-
सध्या सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की जगामध्य सर्वाधिक पाऊस कुठे पडतो?, चला याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Meta AI)
-
भारतातच अशी दोन ठिकाणं आहेत जिथे सर्वाधिक पाऊस पडण्याचा विक्रम आहे. (Photo: Meta AI)
-
चेरापूंजी
जगातला सर्वात जास्त पाऊस चेरापूंजीमध्ये पडतो हे कदाचित तुम्हाला माहिती असेन. (Photo: Meta AI) -
जरी चेरापूंजीमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असल्याची नोंद असली तरी आता चेरापूंजी खाली घसरले आहे व ते दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. (Photo: Meta AI)
-
मावसिनराम
पहिल्या क्रमांकावर आहे मेघालयातील मावसिनराम हे ठिकाण. या ठिकाणी चेरापूंजीपेक्षा १०० मिमी जास्त पाऊस पडतो. (Photo: Meta AI) -
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
या कारणाने त्याचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. (Photo: Meta AI) -
दोन्ही ठिकाणं मेघालयात
दरम्यान, आख्ख्या जगामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारी मावसिनराम, व चेरापूंजी दोन्ही ठिकाणं भारतातल्या मेघालय या राज्यामध्ये आहेत. (Photo: Meta AI) -
सर्वाधिक पाऊस पडण्याचे कारण
मावसिनराममध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील भौगोलिक परिस्थिती आणि मान्सून वाऱ्यांची विशिष्ट दिशा. मावसिनराम तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सून वारे, मावसिनरामजवळून जातात आणि तेथील डोंगरांमुळे अडवले जातात. त्यामुळे, वाऱ्यातील आर्द्रता ढगांमध्ये रूपांतरीत होऊन जोरदार पाऊस पडतो. (Photo: Meta AI) -
किती पडतो पाऊस?
मावसिनराम येथे सरासरी वार्षिक पाऊस ११,८७१ मिमी इतका पडतो. तर काही वेळा यापेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याचेही पाहायला मिळते. (Photo: Meta AI) हेही पाहा- जगातल्या ‘या’ एकमेव देशाच्या राष्ट्रीय ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; तिथे हिंदूंची संख्या किती? जाणून घ्या…

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…