-
फोर्ब्सने जुलै २०२५ पर्यंतच्या सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे या अब्जाधीशांच्या यादीतले टॉप ८ भारतीय व्यक्ती कोण आहेत ते जाणून घेऊयात…
-
मुकेश अंबानी
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे एक भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील १३ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
एकूण संपत्ती: अंदाजे ११२ अब्ज
कंपनी : रिलायन्स इंडस्ट्रीज -
गौतम अदाणी
अदाणी समूहाचे प्रमुख, ज्यामध्ये कोळसा व्यापार, खाणकाम, लॉजिस्टिक, वीज निर्मिती आणि वितरण यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
एकूण संपत्ती: अंदाजे ८५ अब्ज
कंपनी : अदाणी समूह -
शिव नादर
शिव नादर हे एक अब्जाधीश भारतीय उद्योगपती आणि व्यक्ती आहेत. ते दानशूर म्हणूनही ओळखले जातात.
एकूण संपत्ती: अंदाजे ४० अब्ज
कंपनी : HCL टेक्नॉलॉजीज -
सावित्री जिंदाल
देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा समावेश फोर्ब्सच्या यादीतही झाला आहे. ओ.पी. जिंदाल या उद्योगपींच्या त्या पत्नी आहेत.
एकूण संपत्ती: अंदाजे ३८ अब्ज
कंपनी: ओ. पी. जिंदाल ग्रुप -
दिलीप शांघवी
सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, त्यांनी कमी भांडवलात सन फार्माची सुरुवात केली आणि आज ती जगातील एक मोठी फार्मा कंपनी बनली आहे.
एकूण संपत्ती: अंदाजे २६.७ अब्ज)
कंपनी : सन फार्मा (Sun Pharma) -
सायरस पूनावाला
जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीचे ते संस्थापक
एकूण संपत्ती: अंदाजे २५ अब्ज
कंपनी : Serum Institute of India -
कुमार मंगलम बिर्ला
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष, ज्यामध्ये ग्रासिम, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, आदित्य बिर्ला नुवो, आयडिया सेल्युलर, आदित्य बिर्ला रिटेल आणि कॅनडामधील आदित्य बिर्ला मिनीक्स या कंपन्यांचा समावेश आहे.
एकूण संपत्ती: अंदाजे २२ अब्ज
कंपनी : आदित्य बिर्ला ग्रुप -
लक्ष्मी मित्तल
लक्ष्मी मित्तल हे एक यशस्वी उद्योगपती आणि स्टील क्षेत्रातील जागतिक स्तरावरचे महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत.
एकूण संपत्ती: अंदाजे १८ अब्ज
कंपनी: ArcelorMittal

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो