-
शनीदेव, ज्यांना वैदिक ज्योतिषात कर्म, न्याय व दंड यांचे अधिपती मानले जाते, ते आता तब्बल ३० वर्षांनंतर गुरुच्या घरात (मीन राशीत) सरळ चालणार आहेत.
-
येत्या ऑक्टोबर महिन्यात शनीदेव मीन राशीत मार्गी होणार असून, या अद्वितीय खगोलीय बदलाचा प्रभाव सर्व राशींवर जाणवणार असला, तरी फक्त तीन राशींना विशेष वरदहस्त मिळणार आहे.
-
या राशींना मिळणार आहे भाग्योदय, अचानक धनलाभ, प्रतिष्ठा, पदोन्नती आणि अडकलेल्या कामांमध्ये यश.
-
काहींना तर जुनं अडकलेलं धनही परत मिळू शकतं आणि संतानसुखासारखा शुभ योगदेखील प्रबळ आहे. चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
शनीदेव स्वतः या राशीचे स्वामी आहेत. ते आता दुसऱ्या भावात मार्गी होणार आहेत, त्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ लाभू शकते. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून मोठा लाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात स्रोतांकडून उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात.
-
शनी आता या राशीच्या कर्मभावावर प्रभाव टाकत आहेत, त्यामुळे कामकाज, व्यवसाय आणि नोकरीत भरभराटीचे योग आहेत. या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता.
-
शनी आता भाग्यस्थानात मार्गी होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक शुभ संकेतांचा अनुभव येऊ शकतो. रिअल इस्टेट किंवा जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल. शिक्षण, रिसर्च किंवा धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना भरघोस यश मिळेल. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीतून अपार संपत्तीचे धनी होता येऊ शकते. प्रेम जीवनातही आनंद राहू शकतो.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य