-
Earthquake In Russia, What Is The Ring Of Fire: आज सकाळी रशियाच्या कामचात्का द्वीपकल्पाच्या किनारपट्टी भागात ८.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. (Photo: Meta AI)
-
शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामी आली, ज्याच्या पहिल्या लाटा रशियातील सेवेरो-कुरिलस्क येथे प्रचंड शक्तीने आल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Meta AI)
-
लाटा इतक्या तीव्र होत्या की, किनाऱ्यावरील अनेक इमारती पूर्णपणे कोसळल्या व पाण्याखाली बुडाल्या आहेत. दुसरीकडे, जपान आणि हवाई आणि पॅसिफिकच्या इतर किनारी भागातील अधिकारी सायरन वाजवत त्सुनामीचा इशारा देत आहेत. (Photo: Meta AI)
-
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, त्सुनामीच्या लाटा ४ मीटर उंचीपर्यंत उसळल्या असून, अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. (Photo: Meta AI)
-
“आजचा भूकंप गंभीर होता आणि गेल्या काही दशकांमधील सर्वात तीव्र होता” असे कामचात्काचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. (Photo: Meta AI)
-
दरम्यान, हा १९५२ नंतरचा सर्वात मोठा भूकंप असल्याचे रशियन अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेने म्हटले आहे. त्याचबरोबर भूकंपानंतर जवळपास महिनाभर ७.७ रिश्टर स्केलचे धक्के येऊ शकतात असाही इशारा दिला आहे. (Photo: Meta AI)
-
दरम्यान, कामचत्का आणि रशियाचा सुदूर पूर्व भाग पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसलेला आहे. ज्याला भूगर्भीयदृष्ट्या भूकंप आणि ज्वालामुखी प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. (Photo: Meta AI) -
काय आहे रिंग ऑफ फायर?
रिंग ऑफ फायर ही प्रशांत महासागराच्या सभोवताली असलेली ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणांची एक शृंखला आहे. हे क्षेत्र अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालीच्या आकारासारखे असून ४० हजार २५० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. (Photo: Meta AI) -
या क्षेत्रालाच सर्कम-पॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे या भागात ४०० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारा तसेच जपान आणि न्यूझीलंडपर्यंत पसरला आहे. (Photo: Meta AI)
-
रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका या ठिकाणांचा समावेश होतो. (Photo: Meta AI) हेही पाहा- ‘साम्राज्य’च्या ट्रेलरमध्ये दिसणारा जेल २०० वर्षे जुना; ‘या’ देशात केलं चित्रिकरण, विजय देवरकोंडा व दिग्दर्शकाचा खुलासा…

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”