-
रक्षाबंधन जवळ आलं की, गोडधोडाची तयारी सुरू होते. मात्र, पारंपरिक मिठायांमधील साखर आणि तूप आरोग्यास घातक ठरू शकते. त्यासाठी आता अनेक जण खास आरोग्यदायी पर्याय निवडत आहेत. (फोटो सौजन्य : FreePik)
-
गाजर हलव्यात कमी चरबीचे दूघ व गुळाचा वापर
साजूक तुपाऐवजी थोडं लो-फॅट दूध आणि गूळ वापरून हलवा तयार करता येतो. गोडपणात फारसा फरक पडत नाही. (फोटो सौजन्य : FreePik) -
रसगुल्ला साखरेऐवजी स्टीवियात
बंगाली रसगुल्ला आता स्टीविया किंवा नॅचरल स्वीटनरमध्ये तयार केला जातो. चवही तितकीच आणि कमी कॅलरीज. (फोटो सौजन्य : FreePik) -
बेसन लाडूचा नवा अवतार
बेसनऐवजी गव्हाचं पीठ, नारळ व खजूर वापरून लाडू तयार करता येतात. सणासाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य : FreePik) -
रव्याचा शिरा आता गूळ व बदामाच्या दुधात
साखर टाळण्यासाठी गूळ वापरता येतो. बदामाचं दूध शिरा अधिक पौष्टिक बनवतं. (फोटो सौजन्य : FreePik) -
ब्राउन राईस खीर
पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस आणि साखरेऐवजी खजूर वापरून आरोग्यदायी अशी खीर बनवता येते. (फोटो सौजन्य : FreePik) -
ओट्स मोदक
सुका मेवा, खजूर व ओट्स यांचा वापर करून साखरमुक्त मोदक तयार करता येतात. (फोटो सौजन्य : FreePik) -
शुगर-फ्री पेढे
पनीर आणि स्टीवियाने बनविलेले पेढे सणासाठी योग्य आणि कमी साखरेचा पर्याय आहेत. (फोटो सौजन्य : FreePik) -
फळांचा शिरा
साखरेऐवजी केळे, सफरचंद, पपई यांसारखी फळं शिऱ्यात घालून, नैसर्गिक गोडवा मिळवता येतो. (फोटो सौजन्य : FreePik) -
यंदाचं रक्षाबंधन आरोग्यदायी मिठायांनी साजरं करा. घरच्या घरी हे पर्याय सोप्या पद्धतीनं करता येतात आणि त्याद्वारे आरोग्यही जपता येतं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?