-
शेअर बाजारामध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. काही कंपन्यांचा ग्राफ वाढतो, तर काहींचा घसरतो. (Photo: Meta AI)
-
गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत असली तरी एका शेअरने मात्र कमाल केली आहे. (Photo: Meta AI)
-
एका लहान शेअरने त्याच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. हा शेअर एलीटकॉन इंटरनॅशनल या कंपनीचा आहे. (Photo: Meta AI)
-
एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कपंनीच्या स्टॉक प्राईजमध्ये गेल्या एका महिन्यात तेजी पाहायला मिळाली आहे. (Photo: Meta AI)
-
एका वर्षापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक या शेअरमध्ये केली असती तर आजघडीला त्या एक लाखाचं मूल्य १ कोटी रुपयांच्या वर गेलं असतं. कारण एका वर्षापूर्वी या स्टॉकची किंमत १.१० रूपये होती. (Photo: Meta AI)
-
आज बुधवारी या स्टॉकची किंमत बीएसईवर २३५ रुपये आहे. एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचा गेल्या ५२ आठवड्यांचा निचांक १.१० रुपये होता. (Photo: Meta AI)
-
लक्षवेधी बाब म्हणजे या स्टॉकने १५ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या स्टॉकने गेल्या एका महिन्यामध्ये १७८ टक्के, सहा महिन्यात १२०० टक्के आणि एका वर्षामध्ये १९००० टक्के तर ५ वर्षांमध्ये १५००० टक्के एवढा परतावा दिला आहे. (Photo: Meta AI)
-
एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला दुबईतील प्राईम प्लेस स्पाइसेस ट्रेंडिंग एलएलसीने खरेदी केलं आहे. ही कंपनी एफएमसीजी क्षेत्रातली मोठी कंपनी आहे. या डीलनंतर ही कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. कंपनीचं बाजारमूल्य ३२ हजार १६० कोटी रुपये आहे. (Photo: Meta AI)
-
एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड ही भारतीय कंपनी आहे. ती तंबाखू उत्पादनाची निर्मिती व विक्री करते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काम करते. या कंपनीचे पुर्वीचे नाव काशीराम जैन अँड कंपनी लिमिटेड असे होते आणि तिची सुरुवात १९८७ मध्ये झाली होती. (Photo: Meta AI)

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”