-
भारतात रेल्वे ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वांत सोईस्कर आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था आहे.
-
पण अनेक वेळा आपल्याला ज्या गावी जायचं असतं, तिथे आपल्या जवळच्या स्थानकावरून थेट ट्रेन नसते. त्यामुळे प्रवासात दोन-तीन वेळा बदल करावे लागतात, वेळही जास्त लागतो व प्रवासही त्रासदायक होतो.
-
पण भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. हो, अगदी कोणत्याही दिशेला जाणारी. देशातलं एकमेव असं रेल्वेस्थानक कुठे आहे ते जाणून घ्या…
-
हे स्थानक उत्तर मध्य रेल्वे विभागात मोडते आणि देशातील प्रमुख रेल्वेमार्गांवर असलेले हे जंक्शन भारतभर प्रवास करणाऱ्यांसाठी एक केंद्रबिंदू ठरलं आहे.
-
दिवस-रात्र, २४ तास येथे गाड्यांची सतत ये-जा सुरूच असते. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये येथून थेट ट्रेन सेवा सुरू असते.
-
हे रहस्यमय रेल्वेस्थानक म्हणजे मथुरा जंक्शन. उत्तर प्रदेशातील पवित्र नगरी मथुरामध्ये असलेले हे स्थानक भारतातील एकमेव असे स्थानक आहे, जिथून देशाच्या चारही दिशांना थेट ट्रेन उपलब्ध असतात.
-
येथून उत्तर भारतातील जम्मू-काश्मीरपासून ते दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेतील आसामपासून ते पश्चिमेतील गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत थेट ट्रेन सेवा चालते.
-
विशेष म्हणजे दिल्लीतून दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतेक गाड्या मथुरा जंक्शनवरूनच जातात. त्यामुळे हे स्थानक एक महत्त्वपूर्ण जंक्शन बनले आहे.
-
दररोज जवळपास १९७ रेल्वेगाड्या येथे थांबतात, त्यामध्ये राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी, दुरंतो, सुपरफास्ट, एक्स्प्रेस, तसेच लोकल DEMU/MEMU गाड्यांचा समावेश आहे.
-
रेल्वे संचालनालयातर्फे १८७५ साली सुरू झालेल्या मथुरा जंक्शनमध्ये एकूण १० प्लॅटफॉर्म्स आहेत, जे देशातील प्रगत आणि सुविधा-संपन्न स्थानकांपैकी एक मानले जाते. येथून एकाच वेळी पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या सगळ्या दिशांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.
-
त्याशिवाय मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असल्यामुळे लाखो भाविक येथे दरवर्षी दर्शनासाठी येतात. त्यामुळेही येथील रेल्वेस्थानक कायमच वर्दळीने भरलेले असते.
-
मथुरा जंक्शनवरून दररोज शेकडो प्रवासी देशाच्या विविध भागांमध्ये थेट प्रवास करतात. त्यामुळे प्रवासादरम्यान ट्रेन बदलण्याच्या त्रासापासून वाचायचं असेल, तर मथुरा जंक्शनसारखं दुसरं ठिकाण नाही. (फोटो सौजन्य : indian express)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”