-
दिवाळी जवळ येतेय आणि त्याआधीच एक मोठा ग्रहबदल होणार आहे. वैदिक पंचांगानुसार यंदा दिवाळी २० ऑक्टोबरला साजरी होणार आहे.
-
पण, त्याआधी फक्त दोन दिवस आधी देवगुरू बृहस्पती १२ वर्षांनी आपल्या उच्च राशीत – कर्क राशीत प्रवेश करणार आहेत.
-
ज्योतिषशास्त्रानुसार गुरूला ज्ञान, धन, मान-सन्मान व भाग्याचा अधिपती मानलं जातं. अशा स्थितीत गुरूच्या या बदलामुळे काही राशींच्या नशिबाचे पारडं जड होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
-
या राशींच्या करिअर, व्यवसाय आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. त्याशिवाय अचानक मिळणारा धनलाभ या राशींचं भाग्य उजळवणार आहे. आता पाहूया कोणत्या राशींवर गुरू बृहस्पतींची खास कृपा होणार आहे…
-
गुरूंचा हा गोचर तूळ राशी असलेल्यांसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. व्यापाऱ्यांना उत्तम नफा होऊ शकतो. दिवाळीआधीच आकस्मिक धनलाभ किंवा मौल्यवान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
-
गुरू बृहस्पतींचा गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्यदायी ठरेल. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात, परदेशात जाण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. काही काळापासून कोणतेही काम पूर्ण होत नसेल, तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद नांदेल.
-
१२ वर्षांनी गुरू पुन्हा आपल्या उच्च राशीत येत असल्याने कर्क राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ होईल. समाजात मान–सन्मान मिळेल. नोकरी–व्यवसायात भाग्याची साथ लाभेल. देश–विदेश प्रवास, तसेच धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात समाधान मिळेल.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…