-
ईशा भारती पसरीचा
टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती सुनील मित्तल यांची मुलगी आहे ईशा म्हणजे ब्यूटी विथ ब्रेनचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. -
विवाहित
ईशा लंडनमध्ये राहत आहे. ती विवाहित आहे. ईशाचे पती शरण पसरीचा आहेत. जे एका हॉस्पिटॅलिटी फर्मचे संस्थापक आहेत. -
आज आपण सुनील मित्तल यांची एकुलती एक लेक ईशाच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात.
-
रिपोर्ट्सनुसार ईशाने ब्रिटमधील बाथ विद्यापिठातून राजकारण विषयाचे शिक्षण घेतले आहे. ती फ्रेंच व इटालियन भाषेत पदवीधर आहे.
-
ईशाने वडिलांच्या व्यावसायापेक्षा काही वेगळ करण्याचा प्रयत्न केला आहे. ती एक लाईफस्टाईल इन्व्हेस्टर म्हणून काम करते आहे.
-
एवढेच नाही तर ती लंडनमधील मेंबर्स क्लब मेसन एस्टेलची कलात्मक दिग्दर्शकही आहे. कामाशिवाय ती तिच्या कुटुंबियांचीही खूप काळजी घेताना दिसते.
-
साध्या जीवनाला प्राधान्य
अत्यंत श्रीमंत असूनही ईशा व तिचा नवरा दोघेही अतिशय साधे जीवन जगण्याला प्राधान्य देतात. -
इशाने तिच्या वडिलांच्या अब्जावधी रुपयांच्या व्यवसायामध्ये न जाता तिचा स्वत:चा मार्ग निवडला आहे.
-
ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहते व तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.
-
(सर्व फोटो साभार – ईशा भारती पसरीचा, इन्स्टाग्राम) हेही पाहा- १० वर्षांमध्ये पुन्हा होऊ शकतो किडनी स्टोन; ‘या’ ६ पदार्थांपासून राहा दूर…

आयुष्यभर कॅन्सरचा धोका राहणार नाही! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव