-
iPhone 17 Air: काल (०९ सप्टेंबर) बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज लाँच झाली आहे.
-
अॅपलने लाँच केलेल्या आयफोन १७ सिरीजमध्ये प्रो, प्रो मॅक्स, एअर आणि स्टँडर्ड मॉडेलचा समावेश आहे.
-
सीरिजमधील सर्वच मॉडेल्सना ProMotion OLED डिस्प्ले देण्यात आला आहे; ज्याचा १२०Hz रिफ्रेश रेट असेल, त्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अत्यंत स्मूथ असणार आहे.
-
आयफोन १७ एयरची किंमत ९९९ डॉलर भारतीय चलनात ८८,१४३ इतकी आहे.
-
आयफोन एयरमध्ये ४८ एमपीचा फ्यूजन कॅमेरा, १२ एमपीचा पुरक कॅमेरा, अद्ययावत फोकस कंट्रोल, सेंटर स्टेज कॅमेऱ्यामुळे फोन न फिरवता उभे आडवे फोटो घेण्याची सोय, आयफोन एअरमध्ये केवळ इ सिमची सुविधा असणार आहे.
-
आजवरचा सर्वात स्लिम आयफोन, ५.६ मिमी जाडी, तिप्पट स्क्रैच प्रतिबंधक क्षमता, टायटेनियमची फ्रेम, एक्सडीआर डिस्प्ले, चार आकर्षक रंगात उपलब्ध.
-
आयफोन १७ एयरमध्ये पूर्ण दिवस चालणारी बॅटरी, आयफोन एअरला जोडणारी आकर्षक पॉवर बँक असणार आहे.
-
मॅकबुकइतक्या ताकदीने काम करण्याची क्षमता असणार आहे.
-
आयफोन १७ सीरिज प्री-बुकिंगसाठी १२ सप्टेंबर २०२५ पासून उपलब्ध असणार आहे, तर ग्राहकांना १९ सप्टेंबर २०२५ पासून आयफोन १७ खरेदी करता येणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात iPhone प्रेमींसाठी हा मोठा आनंदाचा क्षण ठरणार आहे.

Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं! नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलकांचा हिंसाचार