-
साप आणि मुंगूस यांच्यातील लढाई हा शतकानुशतके कुतूहलाचा विषय आहे. अनेक कथांमध्ये या अनोख्या दोघांच्या संघर्षाचा उल्लेख आढळतो. पण साप आणि मुंगूस समोरासमोर येताच मृत्यूची झुंज का सुरू होते? (Photo: Freepik)
-
साप आणि मुंगूस यांच्यात वैर का आहे?
साप आणि मुंगूस दोघंही शिकारी आहेत आणि ते एकमेकांना त्यांच्या अस्तित्वासाठी धोका मानतात. सापासाठी, मुंगूस त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करतो, तर मुंगूस सापाला केवळ त्याचा शत्रूच नाही तर त्याच्या पिल्लांसाठी देखील धोका मानतो. म्हणूनच, साप आणि मुंगूस समोरासमोर येताच, दोघेही लगेच एकमेकांवर हल्ला करतात. (Photo: Unsplash) -
पिल्लांचं रक्षण
अनेकदा साप मुंगूसाच्या पिलांची शिकार करतात. त्यामुळे, मुंगूस पूर्ण ताकदीने सापाशी लढतो. त्यांच्यासाठी, ही लढाई केवळ स्वतःचा जीव वाचवण्याची लढाई नाही तर भावी पिढ्यांचे रक्षण करणे देखील आहे. (Photo: Pexels) -
निसर्गाने सापांना विषारी दात आणि तीक्ष्ण हल्ल्यांची क्षमता दिलेली आहे, तर मुंगूसांनाही निसर्गाने विशेष शक्ती दिल्या आहेत: (Photo: Unsplash)
-
चपळता आणि वेग:
मुंगूस अत्यंत वेगवान आणि चपळ असतो. तो सापाच्या हल्ल्यापासून वाचू शकतो आणि प्रत्युत्तर देऊ शकतो. (Photo: Unsplash) -
विषाविरुद्ध प्रतिकारशक्ती:
मुंगूसाच्या शरीरातील एसिटाइलकोलीन रिसेप्टर सापाच्या विषाला पूर्णपणे प्रभावित करण्यापासून रोखतो. म्हणूनच साप चावल्यानंतरही मुंगूस लढत राहू शकतो. (Photo: Unsplash) -
तीक्ष्ण दात आणि अचूक लक्ष्य:
मुंगूस सापाच्या डोक्यावर किंवा मानेवर हल्ला करतो, ज्यामुळे साप लगेच असहाय्य होतो. (Photo: Pexels) -
अनेकदा मुंगूसच का जिंकतो?
संशोधन आणि अहवालांनुसार, साप आणि मुंगूस यांच्यातील सुमारे ८०% चकमकींमध्ये मुंगूसच विजयी होतो. त्याची गती, विषाचा प्रतिकार करण्याची क्षमता आणि धैर्य यामुळे तो सापापेक्षा अधिक शक्तिशाली बनतो. असे असले तरी मोठे आणि अधिक विषारी साप कधीकधी मुंगूसलाही हरवतात. (Photo: Pexels) -
अद्भुत लढाई:
साप आणि मुंगूस यांच्यातील लढाई ही केवळ स्पर्धा नाही तर निसर्गाच्या जीवनचक्राच्या रणनीतीचा एक भाग आहे. साप त्याच्या विषावर आणि चपळतेवर अवलंबून असतो, तर मुंगूस त्याच्या धूर्तपणावर, वेगावर आणि जैविक क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणूनच त्यांची लढाई नेहमीच रोमांचक आणि आक्रमक असते. (Photo: Unsplash)
हेही पाहा- Anti-cancer fruits: कर्करोग रोखण्यास मदत करणारे ५ फळं

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…