-
ज्योतिषशास्त्रात शनी देवाला न्यायाधीश मानलं जातं. इतर ग्रहांसारखे शनीही सतत गोचर करत असतात, मात्र त्यांची गती अतिशय संथ असते.
-
साधारणपणे ते अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. राशी बदलाबरोबर ते नक्षत्रांचाही बदल करतात.
-
यंदा ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शनीदेव उत्तराभाद्रपद नक्षत्र सोडून गुरु ग्रहाच्या अधिपत्याखालील पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
-
त्यामुळे काही भाग्यशाली राशींना धनलाभ, समाजात मान-सन्मान आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी पाहा
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा हा नक्षत्र बदल करिअर व नोकरीच्या क्षेत्रात नवा टर्निंग पॉईंट घेऊन येणारा ठरु शकतो. बेरोजगारांना अचानक नोकरीची संधी मिळू शकते, जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित धनलाभ मिळू शकतो.
-
तूळ राशीच्या लोकांसाठी ही वेळ आनंददायी व उत्साहवर्धक ठरणार आहे. या काळात मोठा धनलाभ होऊन नवीन गाडी खरेदी करण्याची संधी हाताशी येऊ शकते.
-
कुंभ राशीसाठी ऑक्टोबर महिना सुवर्णकाळ ठरु शकतो. व्यापारात अपेक्षित यश मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
-
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

देवी कालरात्री कोणत्या रूपात १२ राशींना देणार आशीर्वाद? कोणाची संकट दूर पळून जाणार? वाचा राशिभविष्य