निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येथे १० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपामध्ये हालचालींना वेग आला आहे. तिकीट मिळवण्यासाठी भाजपामध्ये चढाओढ लागली आहे. दरम्यान येथील वरुणा मतदारसंघात चांगलीच चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते तथा विद्यमान विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे या जागेसाठी भाजपातर्फे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र तथा भाजपाचे उपाध्यक्ष बीवाय विजयेंद्र या जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठीची निवडणूक चांगलीच अटीतटीची ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Karnataka: मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन योजना; कर्नाटक विधानसभेसाठी ‘आप’कडून आश्वासनांची खैरात

भाजपा वरुणा या मतदारसंघासाठी बीवाय विजयेंद्र यांनी तिकीट देण्याची शक्यता आहे. याबाबत खुद्द बीएस येडियुरप्पा यांनी सूचक भाष्य केले आहे. विजयेंद्र यांना उमेदवारी द्यावी की नाही? यावर भाजपामध्ये चर्चा सुरू आहे. आम्ही वरुणा मतदारसंघासाठी योग्य तो उमेदवार देऊ, असे येडियुरप्पा म्हणाले आहेत. सिद्धरामय्या यांनी २००८ आणि २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत वरुणा मतदारसंघात विजयी कामगिरी केली होती. पुढे २०१८ साली त्यांनी हा मतदारसंघ त्यांचे पुत्र डॉ. यथिंद्र सिद्धरामय्या यांच्यासाठी सोडला होता. या निवडणुकीमध्ये मी कोलार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे याआधी सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले होते. मात्र काँग्रेसने त्यांना वरुणा मतदारसंघासाठी तिकीट दिले आहे.

हेही वाचा >> Karnataka Assembly Election 2023 : भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? निवडणुकीनंतरच होणार निर्णय?

बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र हे शिकारीपुरा येथून निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. सध्या या जागेवर बीएस येडियुरप्पा आमदार आहेत. येडियुरप्पा यांनी सक्रिया राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र विजयेंद्र या जागेवरून निवडणूक लढवतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र आता त्यांना वरुणा या जागासाठी तिकीट देण्यावर भाजपातर्फे विचार केला जात आहे.

हेही वाचा >> Karnataka Assembly Election 2023 : भाजप आणि देवेगौडा परस्पर पूरक भूमिका घेणार का ?

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये वरुणा या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण ही जागा जिंकण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जाणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election 2023 varuna constituency siddaramaiah and b s vijayendra prd
First published on: 30-03-2023 at 20:02 IST