बारामती : बारामतीचे वरिष्ठ आगारप्रमुख रविराज घोगरे व वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना आज शनिवार ( दिनांक ०१/०३/२०२५ रोजी )बारामती बस स्थानकामध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष चालू करावा, तसेच खाजगी ट्रॅव्हल वाल्यांचा लोकांना होणारा त्रास, व जो पुणे स्वारगेट बस स्थानकावर अनुचित प्रकार घडला तो पुन्हा इतर कोठे ही घडू नये,या करिता पोलीस सुरक्षा बंदोबस्त वाढवणे गरजेचे आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्ष्याच्या वतीने करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉलेजच्या तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेत एक ते दीड तास अगोदर व नंतर स्वतंत्र फक्त विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, बऱ्याच ठिकाणी बस थाबां नाहीत त्या ठिकाणी बस थांबे करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली, दिशादर्शक बोर्ड तसेच हेल्पलाइन नंबर हिरकणी खोलीला हिरकणी बोर्ड लावने या बाबत मागणी करण्यात आलेली आहे. महिलांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करुन तसेच शौचालये स्वच्छता बाबतचे निवेदन बारामती एसटी स्थानक प्रमुखांना देण्यात आले.

या प्रसंगी बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पार्टीच्या महिला अध्यक्ष वनिता बनकर, शहर अध्यक्ष आरती शेंडगे याच्या सह अमित तावरे,जयकुमार काळे,अस्लमतांबोळी वृषाली बांदल,राणी नवले,नितीन तावरे, मनोज केंगार, राजेश जाधव,विठ्ठल करे, अजिंक्य वाघमोडे, चारुदत्त काळे,शहाजी जाधव, रेश्मा शेंडगे,सुनीता झेंडे,स्मिता साबळे, रेखा रणदिवे,माया खुंटे,वर्षा शिंदे,आरती पोळ,कल्पना परदेशी ,रेश्मा शेंडगे, प्रियंका गव्हाळे, उषा शिंदे, सुप्रिया शेंडगे,ममता जाधव आदी कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In baramati sharad pawar ncp party meet st bus stand authority and traffic police inspector for security of bus stand pune print news snj 31 css