Mumbai Pune Nagpur News Updates : डॉ. प्रीती अदाणी यांनी वर्ध्यामधील सावंगी येथे सहज भेट देण्याची ईच्छा दर्शविली. तेव्हा, असे सहज येण्यापेक्षा कार्यक्रमास या अशी विनंती मेघे समूहाने केल्याचे समजले. म्हणून आता विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहचे औचित्य साधून त्यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. डॉ. प्रिती अदानी मंगळवारी येणार म्हणून आजपासून मेघे विद्यापीठ परिसर हाय अलर्टवर मोडवर आला आहे. डॉ. प्रिती यांना झेड सेक्युरिटी कव्हर आहे.  तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळांवर, कसा पाहता येईल याबाबतची माहिती तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 05 May 2025

13:40 (IST) 5 May 2025

राज्यातील सात हजार गावांमध्ये बीजोत्पादन, कृषी संजीवनी प्रकल्प व महाबीज…

या सामंजस्य करारामुळे २१ जिल्ह्यांतील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना स्त्रोत बियाणे किंमत आणि बीज प्रमाणीकरण नोंदणी शुल्क परताव्याच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. …सविस्तर बातमी
13:20 (IST) 5 May 2025

‘मधाचे गाव’ म्हणजे काय? कोणत्या गावाची झाली निवड?

मधमाश्या या केवळ मध आणि मेणच देत नाहीत, तर त्या परागीकरणामुळे शेतीपीक उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ करतात, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मधाचे गाव ही संकल्पना पुढे आली. …अधिक वाचा
12:54 (IST) 5 May 2025

नीट परीक्षेच्या तणावातून दिग्रस येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

अपेक्षित निकाल न लागल्यास आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरेल या भीतीने मानसिक तणावात असलेल्या लकीने रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. …अधिक वाचा
12:24 (IST) 5 May 2025

अनधिकृत झोपडीच्या वादातून दोन गटांत हाणामारी, कुख्यात गुंडाने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

गोरेगावच्या आरे कॉलनी युनिट ३२ येथे हा परिसर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहे. …सविस्तर बातमी
12:22 (IST) 5 May 2025

महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांच्या अटकेचे प्रमाण अत्यल्प! पोलीस विभागाचीच माहिती

राज्यात जवळपास ९ हजार सायबर गुन्हे दाखल असून त्यापैकी केवळ १ हजार ७ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, ही माहिती पोलीस विभागाच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. …वाचा सविस्तर
11:54 (IST) 5 May 2025

चिमुरडीच्या नृत्याने थिरकलले मंच,राष्ट्रीय पुरस्कार आणि अन्य कलानैपूण्य.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नागपुरात सांस्कृतिक ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. त्यात ईशाने लोककला नृत्य प्रकारात पुन्हा प्रथम पुरस्कार जिंकला आहे. …सविस्तर वाचा
11:35 (IST) 5 May 2025

हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळले ५० लाख, अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी

अवघ्या चार महिन्यांत त्याने आरोपींना ५० लाख रुपये दिले. त्यानंतरही त्याला धमकाविणे सुरूच असल्याने अखेर युवकाचा नाईलाज झाला आणि सर्व प्रकार पुढे आला. …सविस्तर वाचा
11:34 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC 12th Result 2025 : महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

Maharashtra Board HSC Result 2025 : एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची महाराष्ट्राची टक्केवारी ९१.८८ आहे.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: एकाचवेळी बोर्डाची वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता! विद्यार्थ्यांनो डिजीलॉकरवरून क्षणात डाऊनलोड करा मार्कशीट; जाणून घ्या कशी

Maharashtra Board Result 2025 Marksheet Download : महाराष्ट्र एसएससी एचएससी निकाल २०२५ डाउनलोड करण्यासाठी डिजीलॉकर कसे वापरावे? …सविस्तर बातमी

11:24 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: यंदा बारावीचा निकाल ९१ टक्के, १३ लाख विद्यार्थी झाले उत्तीर्ण!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आजा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

10:04 (IST) 5 May 2025

मुंबई : पेडर रोडवरील ‘सुखशांती’ इमारतीत लिबासच्या शोरूमला भीषण आग; ८ जणांसह, श्वान आणि मांजरीची सुखरूप सुटका

वांद्रे येथील मॉलला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी ग्रॅण्टरोड येथील पेडररोड या उच्चभ्रू परिसरात एका सहा मजली इमारतीत सकाळी पावणे आठ वाजता आग लागली. …अधिक वाचा
09:46 (IST) 5 May 2025

कोणाला हवी नागपुरात बदली, कोणाला हवी पोलीस जाचातून मुक्तता, भाजप पक्षप्रवेशा मागची कारणे काही वेगळीच !

विरोधी पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य एका पाठोपाठ एक भाजपमध्ये प्र्वेश करीत असल्याने विरोधी पक्ष दुबळा तर भाजप महाशक्तीमान होत असल्याचा प्रचार व प्रसार भाजपकडून केला जात आहे. …वाचा सविस्तर
09:01 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC Result 2025 Date प्रतीक्षा संपली, सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?

Maharashtra Board Class 12th Result 2025 Date : सोमवार दिनांक ५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

सविस्तर बातमी

09:01 (IST) 5 May 2025

बारावीचा आज निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, ५ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

09:00 (IST) 5 May 2025

Maharashta HSC Result 2025 : बारावीचा निकाल कसा पाहाल? जाणून घ्या एका क्लिकवर…

Maharashtra Board HSC Result Update : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. याच निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सविस्तर बातमी

08:59 (IST) 5 May 2025

पुणे : मोटारचालकासह चौघांना पोलीस कोठडी, वडगाव उड्डाणपूल अपघात प्रकरण

मद्यधुंद मोटारचालकासह चौघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा (भारतीय न्यायसंहिता कलम १०५) गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे