पुणे : ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा ; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल - देवेंद्र फडणवीस | Pune The crime of creating social discord against the workers of PFI pune print news amy 95 | Loksatta

पुणे : ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा ; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल – देवेंद्र फडणवीस

पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या आंदोलकांवर पुणे पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार रविवारी सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा ; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या मिश्लिक टीप्पणीला प्रत्युत्तर दिले आहे. “आपण हे ट्रेनिंग सेशन ऑनलाईन करू. त्यामुळे त्यांना तसदी घ्यावी लागणार नाही.

पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या आंदोलकांवर पुणे पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार रविवारी सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सखोल चौकशी करून या संघटनेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना केल्या आहेत. संघटनेवर बंदी घालण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेईल, अशी माहिती फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पाकिस्तान समर्थनार्थ दिलेल्या घोषणा कधीही मान्य होणार नाहीत. राज्यात आणि देशात केलेली भारतविरोधी घोषणाबाजी खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान!

पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. भारतीय जनता पक्षाने या संदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि युवा सेनेकडून त्या विरोधात रविवारी आंदोलने करण्यात आली. फडणवीस यांनीही याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आंदोलकांंनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार १५३ (अ), (दोन गटात व धर्मात तेढ निर्माण करणे), १५३ (ब), (देशाच्या अखंडतेवर प्रतिकूल प्रभाव टाकणारी बदनामीकारक वक्तव्ये), १०९ (गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे) आणि १२० (ब), (कट रचणे) अशी विविध कलमे या गुन्ह्यात अंतर्भूत करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल पाटील यांनी दिली.

हेही वाचा >>> “अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला…”; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंवर निशाणा!

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणेने गुरुवारी ताब्यात घेतले. त्याच्या निषेधार्थ पुण्यात शुक्रवारी पीएफआय संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. त्या वेळच्या प्रसारित झालेल्या चित्रफितीमध्ये आंदोलक विविध घोषणा देताना दिसत आहेत. आंदोलकांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जिंदाबाद’, ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा एकाच वेळी दिल्या जात होत्या. दरम्यान, या आंदोलनाच्या वेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा दावा करीत चित्रफीत प्रसारित झाली होती. त्याच बरोबर ‘एनआयए’च्या कारवाईच्या निषेधार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घोषणाबाजी केली. मात्र, या आंंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बेकायदा आंदोलन केले. घोषणाबाजी केली. बेकायदा आंदोलन करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात विविध कलमांची वाढ करण्यात आली आहे.

चित्रफितीची न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तपासणी
पीएफआयच्या आंदोलनाच्या अनुषंगाने गुन्ह्यांच्या कलमांमध्ये रविवारी वाढ करण्यात आली. आंदोलनानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी एक चित्रफीत प्रसारित झाली होती. त्याची सत्यता आता न्यायवैद्यक शाळेकडून करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> खराडीत वाहतूक पोलिसाला मोटारचालकाकडून धक्काबुक्की; मोटारचालक अटकेत

देशविरोधी घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. काही वर्षे सातत्याने तपास करून, पुरावे जमा करून पीएफआयवर कारवाई करण्यात आली आहे. त्या संदर्भात देशातील विविध राज्यांनीही काही काम केले आहे. आपण यापूर्वीही राज्यात गृहमंत्री असताना त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवत होतो. केरळ राज्याने तर पीएफआय संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. कारवाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी कोणी काही करत असेल, तरी केंद्र आणि राज्य सरकार आणि तपासी यंत्रणा त्यांचे काम करील. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आंदोलकांना परवानगी नसताना त्यांनी जमाव जमवून आंदोलन केले होते. त्यांनी आंदोलनात घोषणाबाजी केल्याच्या अनुषंगाने कलमात वाढ करण्याची मागणी विविध स्तरावर करण्यात आली होती. या प्रकरणात आता भादवि कलम १२४ ए, १५३ ए, १५३ ब, १०९, १२० ब, अशा विविध कलमांची वाढ केली असून पुढील तपास सुरू आहे.- प्रताप मानकर, वरिष्ठ निरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान!Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने मित्राची दहा लाखांची फसवणूक
मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”
Pune Truck Accident: टँकरचे ब्रेक फेल झालेच नव्हते, RTO तपासात मोठा खुलासा, पोलीस म्हणाले “चालकाने…”
शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
व्हिडिओ: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा अनर्थ टळला; भरधाव ट्रक आदळला डिव्हायडरवर आणि…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video : पांढरी दाढी, थकलेला चेहरा, विस्कटलेले केस; ‘तू तेव्हा तशी’मध्ये तरुण दिसणाऱ्या स्वप्निल जोशीचा ‘नो मेकअप’ लूक
“बॉलिवूडचा चित्रपट बनवण्याचा फॉर्म्युला….” ‘फोन भूत’ फ्लॉप झाल्यावर अभिनेता इशान खट्टर स्पष्टच बोलला
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून नव्हे…परळीतून या व्यक्तीने केला पैशांसाठी फोन!
आतड्यांमध्ये जमलेली घाण ‘हे’ ६ पदार्थ सहजपणे काढून टाकतील; कॉस्टिपेशनची समस्याही पुन्हा होणार नाही
विश्लेषण : दिल्ली महापालिकेत ‘आप’ची सत्ता, तरीही भाजपाचा महापौर होणार? कशी आहेत समीकरणं? जाणून घ्या