मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले.ते पाहण्यास प्राणी संग्रालायात अधिकाधिक लोक आले होते आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा,आम्ही अशी अनेक काम केली आहेत.त्याबद्दल देखील बोलत रहा.कोसटल रोड सेना अस देखील बोलू शकता.अशा शब्दात शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.पेंग्विन सेना म्हणून सतत भाजप नेत्याकडून टीका केली जात आहे.त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्र सणांच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील सारसबागे समोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> आधी मर्सिडीज-बेन्झ इंडिया’चे सीईओ आता आदित्य ठाकरे, २५ मिनिटे ताफा वाहतूक कोंडीत अडकले

रश्मी वहिनी यांनी काल टेंभी नाक्यावर जाऊन दर्शन घेतले आहे.तुम्ही किंवा उद्धव साहेब जाणार आहात का ? त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की,तिथे वर्षानुवर्ष दर्शनाला गेलेलो आहोत.त्या प्रमाणेच त्या तिथे दर्शनाला गेल्या असल्याच त्यांनी सांगितले.

दसर्‍यानंतर उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत.तो कसा असणार आहे.त्यावर ते म्हणाले की,आमची शिवसंवाद यात्रा सुरू आहे.उद्धव साहेब देखील बाहेर पडणार आहेत.मात्र त्याच दरम्यान अनेक लोक उद्धव साहेबांना येऊन भेटत आहे.पक्ष प्रवेश होत आहेत.त्यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे सर्वांचा उद्धव साहेबांवर विश्वास असल्याच त्यांनी सांगितल.

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून दसरा मेळाव्या बाबत व्हिडिओ समोर आले आहेत.या दोन्ही व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ते म्हणाले की,अनेक लोक वेगवेगळे मेळावे घेऊ शकतात.मात्र परंपरेनुसार आमचा शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा होणार असल्याच सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

खोके सरकारन टीका करण, हेच आता हास्यास्पद : आदित्य ठाकरे

बाळासाहेबांच्या विचाराच आम्हीच सोन आम्हीच लुटणार अशी टीका केली जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की,मला वाटत खोके सरकारन टीका करण.हेच आता हास्यास्पद झालेल आहे.आज देखील पुणे जिल्ह्य़ात येत असताना एका गोष्टीच दुख वाटत की,वेदांता चा प्रकल्प आपल्या राज्यातून गेला आणि हे त्यांच्या सरकारच्या काळात झाले आहे. घटनाबाह्य सरकार बनल आहे.त्यामुळे हे झाल आहे.देशभरातील शिवसैनिकाची यंदाच्या मेळाव्या बाबत उत्सुकता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

रामदास कदम  : माझ्यावर चांगले संस्कार झाले : आदित्य ठाकरे

रामदास कदम म्हणतात तुम्ही ४० मतदार संघात जाणार,उरलेल्या मतदार संघात का नाही वेळेवर बाहेर का पडला नाहीत. त्यावर ते म्हणाले की,मी त्यांच्यावर कधी बोलतच नाही.माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत.चांगल्या गोष्टीबाबत बोलावे. वेडेवाकडे जे आरोप करतात.त्याच्यावर कधीच बोलू नये. अशा शब्दात शिवसेनेचे नेते माजी आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर सडेतोड उत्तर दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena youth wing chief aditya thackeray visit mahalakshmi temple navratri festivals in pune zws 70 svk88
First published on: 30-09-2022 at 20:23 IST