“राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते ते आता संपले, आता…”, आशिष शेलार यांचं वक्तव्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंबरोबर युती करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरेंनी मराठी माणसांच्या हितासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. उद्धव ठाकरेंनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, भाजपाचे आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध संपल्याचं जाहीर केलं.