चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी नाल्यात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटनेने खळबळ
घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत रविवारी सायंकाळी ४ वाजता एका चिमुकलीचा जीव वाचवताना शहजाद शेख (२७) या तरुणाचा मृत्यू झाला. सोनाली बंजारा नावाची मुलगी नाल्यात पडल्यावर शेख आणि संदीप सुतार (३७) तिला वाचवायला गेले. सुतार बाहेर आला, पण शेखचा पाय अडकून तो बुडाला. शेखला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या पश्चात पत्नी आणि चार मुले आहेत.