Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, “आयुष्य पुढे…”
वल्लरी विराज व राकेश बापट यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका खूप लोकप्रिय झाली. मात्र, या मालिकेतील फक्त या दोनच कलाकारांनी नाही, तर सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आता मालिकेत लक्ष्मी ही भूमिका साकारणार्या अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वल्लरी विराज, भूमिजा पाटील, शर्मिला शिंदे, तसेच सेटवरील इतर कलाकार त्यामध्ये दिसत आहेत.