दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार - देवेंद्र फडणवीस | Devendra Fadnavis will maintain law and order in the background of Dussehra melava amy 95 | Loksatta

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार – देवेंद्र फडणवीस

मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार असून राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नाही.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार – देवेंद्र फडणवीस
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांनी सोमवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतले.

मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार असून राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नाही. परंतु त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाण्यात केले.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचे झिंगाट गाण्यावर नृत्य ; नगरविकास प्रधान सचिवांकडे तक्रार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांनी सोमवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतले. देवी दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी शिवसेना -भाजपा युतीचे सरकार स्थापन केले असून या सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे काम करण्यासाठी देवीकडे शक्ती मागितली, असेही त्यांनी सांगितले. आपला महाराष्ट्र चिंतमुक्त व्हावा आणि ज्या काही समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, असे मागणे देवीकडे मागितल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार असून राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नाही. परंतु त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेणार आहेत, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोंबिवलीतील तरुणाचा मुुलुंडमध्ये दांडिया खेळताना मृत्यू

संबंधित बातम्या

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय
मुख्यमंत्री उद्या ठाणे महापालिकेत; विविध प्रकल्पांचा आढावा घेण्याबरोबरच विविध उपक्रमांचा शुभारंभ
ठाणे: आर्थिक संकटात असलेल्या पालिकेवर पडणार सातवा वेतन आयोगाचा भार
घनकचरा व्यवस्थापनाऐवजी थेट कचऱ्याला ‘अग्नी’; अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी
बदलापूरः इथे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य होतो सरपंच ; सरपंचपदाचा ढोके दापिवली पॅटर्न चर्चेत, प्रत्येक जण सात महिन्याचा सरपंच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन