कल्याण – कल्याण पूर्वेतील महावितरणच्या जाईबाई फिडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता.२१) रोजी करायचे आहे. या कामासाठी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत कल्याण पूर्व भागातील जाईबाई फिडरवरून ज्या भागाला वीज पुरवठा महावितरणकडून करण्यात येतो, त्या भागाचा वीज पुरवठा बंद राहणार आहे, असे कल्याण शहर वालधुनी शाखेच्या अभियंत्यांनी सांंगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाईबाई फिडरवर देखभाल दुरुस्ती व उच्चदाब वीज वाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी हाती घेतले जाणार आहे. हे काम विहित वेळेच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे अभियंत्याने सांगितले. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, विठ्ठलवाडी, राय पॅरेडाईज इमारत, राय निसर्ग, साई हाईट्स, तिसाई धाम, अवधाराम नगर, आत्माराम नगर, नेहरू नगर, विठ्ठल मंदिर, टाटा काॅलनी, रायगड काॅलनी परिसराचा वीज पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत देवीचापाडा येथील जुगार, गांजाच्या अड्डयांमुळे नागरिक त्रस्त

हे काम तातडीने करायचे असल्याने हा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना या बंदच्या काळात थोडा त्रास होईल, यासाठी नागरिकांनी महावितरणाला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power supply to kalyan east to be cut off on tuesday thane news amy