Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून पोटभर हसू येते तर काही व्हिडीओ पाहून डोळे भरून येते. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली डॉक्टरांच्या पाया पडताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकली डॉक्टरांना एकचॉकलेट देत आहे आणि त्यांच्या पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर डॉक्टरसुद्धा तिला सुंदर गिफ्ट देताना दिसत आहेत.

हेही वाचा : ११ कोटींचे शूज पाहिले का? वाचा, हे शूज इतके महाग का?

व्हिडीओ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “निरागस बालमन, प्रेम! सानवीला आज डिचार्ज होता. गंभीर आजारातून ती बरी झाली होती. नेमका आज तिचा वाढदिवस होता. जाताना मला एक चॉकलेट देत आशीर्वाद घेतले… ‘निरागस बालमन! ते प्रेम’ मी कधीच विसरू शकत नाही.”

हेही वाचा : Viral Video : नवरीला पाहताच भरमांडवात नवरदेव ढसाढसा रडायला लागला, पाहा व्हायरल व्हिडीओ …

सानवी ही गंभीर आजारातून बरी झाली. बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी तिच्यावर उपचार केले. ज्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी नेमका तिचा वाढदिवस होता. त्यामुळे चिमुकल्या सानवीने डॉक्टरांचे आशीर्वाद घेत हॉस्पिटलचा निरोप घेतला.
चिमुकली आणि डॉक्टरांचा हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावुक झाले आहेत. अनेकांनी सानवीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl greets doctor after recovering from a serious disease watch heart touching video ndj