फॅशनच्या नावाखाली आजकाही कोणीही काहीही कपडे तयार करतात आणि काहीही कपडे परिधान करतात. उर्फी जावेदचे फॅशन व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच…ती कोणत्याही वस्तूपासून ड्रेस तयार करते आणि परिधानही करते. तिच्या विचित्र ड्रेसची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर होत असते. सध्या असाच एक विचित्र ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. एका कपड्यांच्या मोठ्या ब्रँडने डिझाइन केलेला हा ड्रेस सध्या चर्चेत आला आहे. हा ड्रेस पाहून कोणीही चक्रावून जाईल. हा विचित्र ड्रेस पाहून दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झारा स्टोरमध्ये मिळणाऱ्या कपड्यांच्या आगळ्या वेगळ्या डिझाईन्सबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. लोकांनी सोशल मीडियावर या कपड्यांवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. या ‘विचित्र’ पोशाखाने फॅशन प्रेमींचे डोके चक्रावले आहे आणि हा ड्रेस कसा कसे घालावे किंवा कसा वापरावा असा प्रश्न सर्वांनी पडला आहे. निकिता घोषने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर तिच्या फॅशन सिक्रेटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे

हेही वाचा – हॉस्टेलमध्ये तरुणींनी केला जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहताच नेटकरीही झाले फॅन, म्हणाले, ‘रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा …’

लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला हा पोशाख डेनिम बेल्टसारखा दिसतो, त्याच्या दोन किंवा तीन पट्ट्या सलग जोडल्या आहेत ज्या समोरच्या बाजूला एकत्र बटण आहेत. हा ड्रेस अत्यंत आश्चर्यकारक आहे. त्याच्या अनोख्या डिझाइमुळे लोकांनी वाटले तो अर्थ घेत हा ड्रेस कसा परिधान करायाचा याचा अंदाज बांधला आहे. कोणी म्हणे, बटनमुळे हा ड्रेस अंतवस्त्र समजत

अनेक लोकांनी मजेत म्हटले की हा ड्रेस उर्फी जावेदसाठी एकदम योग्य आहे, जी आपल्या बोल्ड आणि अपरंपरागत फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. आता तुम्हाला सांगतो की, अखेर हा काय प्रकार? झाराच्या वेबसाइटवर तुम्हाला हा आउटफिट दिसेल ज्याची नाव ‘Sash belt with buckles’ असे आहे आणि त्याची किंमत २२९० रुपये इतकी आहे.

झाराच्या कलेक्नशमधील विचित्र ड्रेस ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Belt or dress netizens laughed at the strange dress said it it urfi javed dress snk