Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईंचे मनोरंजन करत असतात. सध्या दोन चिमुकल्यांचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कोणत्या व्यक्तीमध्ये काय कला असेल हे सांगता येत नाही. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तर असे वेगवेगळे हुनरबाज लोक आपल्याला नेहमीच दिसतात. मात्र, सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा काही एखाद्या माणसाचा नाही. तर हा व्हिडीओ दोन छोट्या मुलांचा आहे. त्यांनी केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. डान्सदरम्यान या चिमुकल्यांनी केलेले हावभाव आणि डान्स करतानाची त्याची तन्मयता नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकात, ही मुलं रस्त्यावर राहणारी मुलं आहेत. गरिबी, भूक, उद्याची चिंता विसरून हे दोघे भाऊ बहिण जगाला विसरुन बेभान नाचत आहेत. “आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, रडणं तर रोजचंच आहे,” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: आई मासे विकत होती; मुलगा ३ वर्षांनी अचानक आला समोर अन्…पाहताच धाय मोकलून रडू लागले माय-लेक

हा व्हिडीओ पाहून नेटकरी खुश झाले असून त्यावर मजेदार असा प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला सध्या फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर उत्स्फूर्तपणे शेअर केले जात असून ‘चांगल्या चांगल्या डान्सर सुद्धा या चिमुकल्यापुढे फिक्या पडल्या आहेत’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brother and sister energetic dance on road went viral on social media trending today srk