Indian Railway : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सेवा- सुविधांसाठी अनेक बदल, नियम करत असते. असाच एक नवा बदल भारतीय रेल्वे १ एप्रिलपासून लागू करणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकणारी भारतीय रेल्वे १ एप्रिलपासून रेल्वे कॅटिंग(की कँटीन), तिकीट, दंड आणि पार्किंगपर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू करत आहे. विशेष म्हणजे आता रेल्वे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून क्यूआर कोड स्कॅनिंगच्या मदतीने दंड वसूल करणार आहे. रेल्वेच्या या नव्या बदलामुळे आता प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवासादरम्यान तिकिटाविना पकडले गेल्यास आणि कॅश नसेल, अशावेळी डिजिटल पेमेंट करून तुरुंगात जाणे टाळू शकता येईल. यासाठी रेल्वे तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन पुरवणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc indian railways completely digital from 1 april payment can be online for parking ticket fine sjr
First published on: 22-03-2024 at 00:10 IST