Viral Video: आयुष्यात यशस्वी होण्याचे स्वप्न प्रत्येक जण शाळा, कॉलेजमुळे पाहतो. येथे शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींचाच विद्यार्थी आदर्श घेतात. शाळेला ज्ञानाचे मंदिर म्हटले जाते. पण हल्लीच्या शाळा, कॉलेजांमध्ये अशा काही गोष्टी घडतात, ज्या पाहून कोणालाही धक्का बसेल. अनेकदा या सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये शाळेतील शिक्षकांची, मुख्याध्यापकांची चुकी असते. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील प्रचंड संताप व्यक्त कराल.

मागील काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात शाळेची मुख्याध्यापिका शाळेतील एका शिक्षिकेकडून फेशियल करत होती. हा व्हिडीओ त्याच शाळेतील एका शिक्षिकेने काढला होता, ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. दरम्यान, आता पुन्हा अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी निवासी शाळेतला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेचा चौकीदार शाळेतील एका विद्यार्थिनीकडून चेहऱ्याची मसाज करून घेत आहे. तर पुढे दिसणाऱ्या व्हिडीओत शाळेतील मुलीकडून साफ-सफाई करून घेतली जात आहे. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा: निर्लज्जपणाचा कळस! रिल्ससाठी मरिन ड्राइव्हवर तरुणीचा अश्लील डान्स; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “आता मुंबईतही घाण..”

पाहा व्हिडीओ:

या प्रकरणाचा तपास प्राथमिक शिक्षण अधिकारी (बीईओ) कोमल सांगवान यांनी केला असून त्यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, “ही घटना कालच माझ्या माहितीत आली, मी यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली आहे आणि समितीचा अहवाल आला आहे. प्रथमदर्शनी वॉचमन दोषी आहे म्हणून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल”, असे त्यांनी सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Priya singh या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ शेअर करत त्या महिलेने कॅप्शनमध्ये, “उत्तर प्रदेशातील शामली येथील कस्तुरबा गांधी मुलींच्या निवासी शाळेतील हा प्रकार आहे. या ठिकाणी विद्यार्थिनींकडून मसाज करून घेतली जात आहे”, असे म्हटले आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास पंचवीस हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप वाईट, येथील सरकारने यावर कडक कारवाई करायला हवी.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हा आहे आत्मनिर्भर भारत”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “सरकारी नोकरदार काम करण्यासाठी लाच घेतात आणि काम न करण्यासाठी सरकारकडून पगार घेतात, त्यामुळे सर्वांना सरकारी नोकरी हवी आहे.”