झाडूचा वापर आपण घरातील आणि घराबाहेरील कचरा काढण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी करतो. यामुळे अनेक प्रकारच्या झाडू आपल्याला बाजारात पाहायला मिळतात, या वेगवेगळ्या आकाराच्या, उंचीच्या झाडू आपण घराची उंची आणि अस्वच्छता बघून वापरत असतो. यात जुन्या प्रकारच्या झाडूशिवाय आता बारीक काठीच्या झाडू, प्लॅस्टिक, नायलॉनच्या झाडू सहज बाजारात मिळतात. पण आजवर तुम्ही कधी पौष्टीक झाडूबाबत ऐकलं आहे का? हे वाचताना तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण सध्या सोशल मीडियावर एका पौष्टीक झाडूची जोरदार चर्चा सुरु आहे, ज्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका दुकानात या पौष्टीक झाडू ठेवण्यात आल्या आहेत. या झाडू ज्या पॅकेटमध्ये पॅक केल्या आहेत, त्या पॅकेटवर एक कॅलरीचा चार्ट छापण्यात आला आहे. ज्याप्रकारे एखाद्या खाद्यपदार्थाच्या पॅकेटच्या मागे कॅलरीज, फॅट आणि प्रोटीन्सचा चार्ट असतो अगदी तसाच चार्ट या झाडूच्या पॅकेटवर छापण्यात आला आहे. या कॅलरी चॉर्टमध्ये कोलेस्टेरॉल, सोडियम, फॅट अशा सर्वकाही गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही झाडू नेमकी साफसफाई करण्यासाठी आहे की खाण्यासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.

एका व्यक्तीने ट्विटरवर झाडूचा मजेशीर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, कधी तुम्हाला ही झाडू खायचं मन झालं तर त्यावर कॅलरी चार्ट आहे. या फोटोवर आता भन्नाट कमेंट्स येत आहेत. इतक्या वर्षांपासून आम्हाला झाडूतील या पौष्टीकतेबाबत माहितचं नव्हते, अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्या एकाने ही झाडू सॉसबरोबर खाणे चांगले, असे म्हटले आहे. झाडूच्या पॅकिंगवरील ही चूक आता अनेकांसाठी हसण्याचा विषय बनवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritional broomstick kept in shop viral with calorie chat twitter sjr