Wedding Funny Video : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही दररोज लग्नसमारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात, ज्यांना लाखोंच्या घरात व्ह्युज मिळतात. यातील काही व्हिडीओ फार भावनिक तर काही फार मजेशीर असतात, जे आपल्याला खळखळून हसवतात. लग्नसमारंभात अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. सध्या लग्नसमारंभातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून १०० टक्के तुम्हीही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही. कारण यात नवरा-नवरीचा लूकच असा आहे की, उपस्थित पाहुणे मंडळीदेखील म्हणतायत, अरेच्या हे तर सेम टू सेम..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत एका हॉलमध्ये लग्न सुरू असल्याचे दिसत आहे, नवरा-नवरी विधीसाठी बसलेत. विधी सुरू असल्याने आजूबाजूला पाहुणे मंडळी उभी आहेत. पण, व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मागे उभं असलेलं जोडपं अगदी त्यांच्यासारखंच दिसतंय, म्हणजेच नवरा-नवरी दोघंही एकसारखेच दिसतायत. विशेष म्हणजे जेव्हा त्या दोघांना दुरून पाहतो तेव्हा असे वाटते की, एखाद्या चित्रपटात पाहत आहात ज्यामध्ये दुहेरी भूमिकेचा सीन चालू आहे. म्हणूनच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा मजेशीर व्हिडीओ @3.idiotes नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आल आहे, ज्यावर ‘Ctrl C + Ctrl V.’ असे लिहिलेय. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “डबल रोल”, दुसऱ्याने लिहिले की, “दोन जुळी मुले दोन जुळ्या मुलींशी लग्न करत आहेत.” तिसऱ्याने लिहिले की, “अरे हे सर्व एकसारखेच दिसतायत.” चौथ्याने लिहिले की, “हे कॉपी पेस्ट आहेत.” अनेक युजर्सनी आश्चर्यचकित करणारी तर काहींनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding funny video you will be amazed to see the bride and groom watch the viral video sjr