Viral Video : रेल्वे हे आपल्या देशातील प्रमुख प्रवासाचे साधन म्हणून ओळखले जाते. दरवर्षी हजारो लोक रेल्वेनी प्रवास करतात पण अनेक जण रेल्वेतून विनातिकिट प्रवास करताना दिसून येतात अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी तिकिट चेक करण्यासाठी काही पोलीस नेमले जातात जेणेकरून कोणीही विनातिकिट प्रवास करणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन पोलीस अधिकारी प्रवाशांचे रेल्वेचे तिकिट तपासताना दिसत आहे पण रेल्वेस्टेशनवर एक तरुण जेव्हा तिकिट दाखवतो, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, या तिकिटवर नेमके काय असते? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन पोलीस अधिकारी रेल्वेत कोणीही विनातिकिट प्रवास करू नये म्हणून तिकिट तपासत आहे त्यानंतर ते रेल्वे स्टेशनवर प्रवाशांवर लक्ष ठेवत एका ठिकाणी बसलेले दिसतात. जेव्हा हे दोन पोलीस अधिकारी नोकरीची वेळ संपल्यानंतर परत जाताना दिसतात तेव्हा एक तरुण त्यांच्याजवळ येतो आणि त्यांच्यापैकी एका पोलीस अधिकाऱ्याला तिकिट दाखवतो.

हेही वाचा : “ही मुंबईचं नाव खराब करतेय”, रेल्वेस्थानकावरील तरुणीचा विचित्र डान्स VIDEO पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, “वेडेपणा…”

तिकिट पाहताच पोलीसाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते. ते तिकिट पाहून खूप आनंदी होतात आणि हसत हसत तरुणाबरोबर हॅन्ड शेक करतात. त्यानंतर हा तरुण या काकांबरोबर सेल्फी काढतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तिकिटावर असे काय होते की पोलीस पाहून आनंदी झाले.

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा तरुण या दोन पोलीस अधिकाऱ्यांपैकी एका पोलीस अधिकाऱ्याचे तिकिटावर लपून सुंदर स्केच काढतो. जेव्हा स्केच काढलेले तिकिट पोलीस अधिकारी बघतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी पाणघोड्याबरोबर केले असे काही की, video पाहून संतापले लोक, म्हणाले, “अटक…”

imaginelife_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोलिसांनी तिकिट विचारले आणि मी त्यांना अचंबित केले.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका पोलीस युजरने लिहिलेय, “तुमच्या सारख्या लोकांचे प्रेम आम्हाला आणि आमच्यासारख्या चांगल्या लोकांना सेवा करण्यासाठी प्रेरित करते आणि तरीसुद्धा हल्ली लोकांचा पोलिसांप्रति जो व्यव्हार आहे, ते पाहून वाईट वाटते.” तर एका युजरने लिहिलेय, “पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद” आणखी एका युजरने लिहिलेय, “कला नेहमी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणते”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When a guy show railway ticket to the police man made him happy what is on that ticket watch video viral ndj