भारत विरुद्ध पाकिस्तान हा नेहमीच चर्चेत असणारा सामना यंदा रविवारी रंगणार आहे. या महामुकाबल्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. सामना जरी रविवारी रंगणार असला तरी सोशल मीडियावर या संबंधित असंख्य पोस्टचा वर्षाव होत आहे. कोण जिंकणार? कोणता खेळाडू किती रन करणार? याचा बोलबाला सोशल मीडियावर आहे. अशातच भारतीय संघाचा बॉलर जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा बॉलर शाहीन आफ्रिदी यांच्यात इंटरनेटवर तुलना केली जात आहे. याबदल असंख्य पोस्टही केल्या जात आहेत. त्या दोघांच्या कौशल्याचीही सध्या तुलना केली जात आहे. जसप्रीत बुमराहशी तुलना होणारा हा शाहीन आफ्रिदी आहे तरी कोण? जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी टी -२० विश्वचषक, सुपर १२ च्या पहिल्या लढतीत भारताचा सामना पाकिस्तानशी होईल. गोलंदाजीला सामन्यात खूप महत्त्व असू शकते. भारतासाठी जसप्रीत बुमराह आक्रमणाचे नेतृत्व करेल. त्याच्याकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा मजबूत हंगाम होता. दुसरीकडे, शाहीन आफ्रिदी पाकिस्तानसाठी महत्त्वाची व्यक्ती आहे.

( हे ही वाचा: Covid-19 Caller Tune: १०० कोटी डोसचे रेकॉर्ड पूर्ण होताच, करोना कॉलर ट्यून बदलली!

२१ वर्षीय शाहीनने २०१८ मध्ये पाकिस्तानसाठी त्यांच्या संघात प्रवेश केला.

त्याने पाकिस्तानसाठी ३० टी -२० सामने खेळले असून त्याने २७.४० च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने ३/२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली आहे.

आफ्रिदी सध्या पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू आहे.त्याचे सर्वोत्तम रिटर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले आहेत.

त्याने त्यांच्याविरुद्ध १५.८७ वर आठ स्कॅल्प घेतले आहेत.

( हे ही वाचा: हवामानाचे अपडेट देत असताना अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ, टीव्ही अँकरचा व्हिडीओ व्हायरल! )

पाकिस्तानचा सुपरस्टार अष्टपैलू शाहिद आफ्रिदी लवकरच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा सासरा होणार आहे अशा चर्चाही अनेक महिन्यापासून होत आहेत. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद आफ्रिदीची मुलगी आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लग्न करणार आहे. बातमीनुसार, दोन्ही कुटुंबांनी या लग्नासाठी सहमती दर्शवली आहे आणि लवकरच शाहीन आणि अक्सा लग्नबंधनात अडकणार आहेत. शाहीनचे वडील अयाज खान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is shaheen afridi compared to jaspreet bumrah ttg
First published on: 22-10-2021 at 12:48 IST