[ie_dailymotion id=x7g1f6e] बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून कामापेक्षा त्याच्या मुलांमुळेच अधिक चर्चेत आला आहे. गोंडस तैमुरचे फोटो सर्वांचेच लक्ष वेधत असताना त्याची मोठी मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण, आपल्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी सैफ काही खूश नसल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच त्याविषयी सैफने केलेल्या वक्तव्यामुळे त्याने पहिली पत्नी अमृता सिंग हिचा रोष ओढावून घेतल्याचे चित्र आहे.