Chatushrungi Devi Temple: श्री देवी चतुःशृंगी मंदिरात यंदा नवरात्रीचं नियोजन कसं असेल? जाणून घ्या
देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील श्री देवी चतुःशृंगी मंदिरात सकाळपासून हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेण्यास एकच गर्दी केली आहे. देवीची मूर्ती स्वयंभू असून ती एका बाजूला झुकलेली आहे. तसंच
देवीचे दागिने हे पेशवेकालीन आहेत, अशी माहिती विश्वस्त नंदकुमार अनगळ यांनी दिली. शिवाय नवरात्रीचे नऊ दिवस मंदिर समितीचं नियोजन कशाप्रकारे असेल याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.












