फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी बाजपेयी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चित्रपट, दूरचित्रवाणी अशा माध्यमांमुळे रंगभूमी संपेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. आता इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढी रंगभूमीकडे वळत आहे. त्यामुळे रंगभूमी पुन्हा बहरलेली दिसेल, असा आशावाद ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांनी व्यक्त केला.